Maharashtra Lok Sabha Election  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : राष्ट्रवादीत प्रवेश करताच धाराशिवमधून अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर; कोण आहेत अर्चना पाटील?

Lok Sabha Election 2024 : भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

देशात आणि राज्यातल्या काही भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे. मात्र राजकीय पक्षांचं जागांचं गणित अद्याप जुळताना दिसत नाही नसल्याचं चित्र आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि सध्या या दोन्ही आघाड्यांपेक्षा चर्चा असलेल्या वंचित बहुजन आघाडीमुळे दरदिवशी नवा ट्विस्ट पहायला मिळत आहे. दरम्या्न महायुतीतून धाराशिवची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली आहे. तुळापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव अजित पवार गटाने दिला होता. मात्र राणा जगजितसिंग पाटील यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. आता त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच धाराशिवमधून त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. धाराशिवची जागा अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे पक्षप्रवेशानंतर धाराशिवमधून अर्चना पाटील यांना उमेदवारी घोषीत करतील अशी चर्चा होती. दरम्यान अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे अर्चना पाटील विरूद्ध ओम राजे निंबाळकर यांच्यात थेट लढत होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही जागा राणा जगजितसिंह पाटील यांनी लढवावी, असा प्रस्ताव अजित पवारांनी यापूर्वीच दिला होता. मात्र, सध्या भाजपमध्ये असलेल्या राणा पाटील यांनी याला साफ नकार दिला आहे. त्यामुळे राणा पाटील यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनीअजित पवार गटात प्रवेश केला आहे. राणा जगजितसिंग पाटील यांनी आज सकाळी अजित पवार यांची भेट घेतली होती.

अर्चना पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

धाराशिव येथून उमेदवारी घोषित झाली आहे. नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्व कणखरपणे करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात भाजप ४०० पार भाजप जागा जिंकणार आहे. भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हावं म्हणून मोदी काम करतील. मोठे निर्णय या टीममधून घेतले जातील. एका महिलेला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. महिलांचा सन्मान करण्याचा संदेश राष्ट्रवादीने दिला असल्याचं त्या म्हणाल्या.

निवडणुकीत समोर कोण आहेत पाहणार नाही. कारण कोणाला हरवण्यासाठी निवडणूक लढवत नाही आहे. जनतेचे विषय सोबत आहेत. जनता विकासाला मतदान करणार आहे. माझं नाव सगळ्यात शेवटी आलंच राणा जगजितसिंग पाटील जे काम केलं पद्मसिंह पाटील यांनी जे काम केलं आहे त्यांच हे फलित आहे. माझ्या कामाचा १० टक्के वाटा देखील त्यात आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT