Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : ...तरी मी आधीपासूनच हुशार; मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

Lok Sabha Election 2024/Pune Lok Sabha : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं आहे. महादेव जानकर यांनी मला हुशार झाले असं म्हटलं तरी मी आधीपासूनच हुशार असल्याचं त्यांनी म्हटलं, त्यामुळे एकच हश्या पिकला. महादेव जानकर महाविकास आघाडी सोबत जाण्याच्या चर्चा आहेत आणि पंकजा मुंडे या आता हुशार झाल्या आहेत, मात्र त्यांना कुठे थांबवायचं हे मला माहिती आहे, असं महादेव जानकर यांनी म्हटलं होतं. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी असं उत्तर दिलं आहे.

पुण्याचा हक्काचा खासदार म्हणून त्यांनी लोकसभेत जावं. मी मोठी बहीण असल्याने मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहे, भाजप मित्रपक्षासोबत कोअर कमिटी काम करत आहे. मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर नक्की काम करेन. कोणतीही कटुता नाही. महादेव जानकरांची समजूत काढण्यासाठी पक्षाने जबाबदारी दिली तर नक्की त्यावर विचार करेन असंही त्या म्हणाल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात जात असताना रस्त्यात येणाऱ्या सर्व मतदारसंघात जात आहे. पुण्याचे उमेदवार असलेले मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे. मोहळ यांनी युवा मोर्च्यात काम केलं आहे. गोपीनाथ मुंडे यांचे लाडके होते.

पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत. प्रितम मुंडे यांच्या जागी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. बीड जिल्हा हा पुढारलेला आहे. आतापर्यंत वेगवेगळा समाजाचे खासदार दिले आहेत. माझ्याबद्दल कोणतीही कटुता नाही. सर्वसमावेशक म्हणून काम करते. समोरील उमेदवार विरोधी पक्षाचा उमेदवरा म्हणून पाहणार जात म्हणून पाहणार नाही.पक्षाने सागितलं तर राज्यात प्रचार करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Filmcity Makeup Artist : मुलीमुळे आईचा झाला भंडाफोड, आर्टिस्ट नवऱ्याला संपववलं होतं, पत्नी-प्रियकराच्या कटाचा पर्दाफाश

Bigg Boss 19 : मराठमोळ्या अभिनेत्याची सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये एन्ट्री? स्वत:च केला खुलासा

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाच्या आमदाराला राधाकृष्ण विखे पाटील यांची महायुतीत येण्याची खुली ऑफर

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! खासदार विशाल पाटलांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश

New Income Tax Bill: नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर, करदात्यांसाठी केले महत्त्वाचे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT