महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बिनशर्त पाठिंब्याचा लोकसभा निवडणुकीत महायुती फायदा झाला आहे. यंदाच्या लोकसभेत महाविकास आघाडीने चांगलीच झेप घेतली आहे. महाविकास आघाडीला ३० जागांवर विजय मिळाला आहे, तर महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण राज्यात भाजपची पिछेहाट झाल्याचं चित्र आहे.
या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha 2024) मनसेच्या पाठिंब्याचा महायुतीला फायदा झाल्याचं चित्र आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये राज ठाकरेंनी सभा घेतल्या होत्या. त्या सभांचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा झाल्याचं दिसत आहे. राज ठाकरेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या होत्या. मुंबईत मात्र राज ठाकरेंच्या (MNS Raj Thackeray) सभांचा जास्त परिणाम झाल्याचं दिसत नाहीये.
या चारही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे महायुतीला मनसे फॅक्टरचा नक्कीच फायदा झाल्याचं दिसत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात चुरशीची लढत झाली होती. यामध्ये नारायण राणेंचा विजय झाला आहे. तर ठाण्यात महायुतीचे नरेश मस्के विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे (Maharashtra Lok Sabha Election 2024) अशी लढत झाली होती. यामध्ये नरेश मस्केंनी गुलाल उधळला आहे.
तर कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदे विरुद्ध मविआच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत झाली होती. यामध्ये श्रीकांत शिंदेंनी बाजी मारली. तर पुण्यात मुरलीधर मोहळ आणि रविंद्र धंगेकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. मात्र मुरलीधर मोहळ यांनी दणक्यात विजय मिळवला आहे.
मुंबईत शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंनी एकत्र येत महायुतीचा (Mahayuti) प्रचाराचा धुरळा उडवला होता. थोडक्यात काय तर मनसे पॅटर्नने महायुतीला लोकसभेत तारल्याचं चित्र आहे. एकंदरीत लोकसभेत मनसेचा महायुतीला फायदा झाला आहे. परंतु मुंबईत महायुतीचे मताधिक्य घटलेले आहे.
महायुतीला मनसे फॅक्टरचा फायदा मुंबईत जास्त करून घेता आला नाही, असं दिसत आहे. मुंबई दक्षिण मध्यमध्ये मनसेचे फॅक्टर शिंदेसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे, मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहिर कोटेचा, मुंबई उत्तर मध्यमध्ये उज्वल निकम, मुंबई दक्षिणमध्ये यामिनी जाधव यांना वाचवण्यात अपयशी ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.