Mahayuti Seat Sharing Issue
Mahayuti Seat Sharing Issue  Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election: महायुतीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा पेच कायम; भाजपमधील इच्छुकांच्या भेटीगाठी वाढल्या

Rohini Gudaghe

सुरज मसुरकर साम टीव्ही, मुंबई

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचा (South Mumbai Lok Sabha Constituency) ट्विस्ट आणखी वाढला असल्याचं दिसत आहे. एकीकडे शिवसेनेकडून यामिनी जाधव यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. तर दुसरीकडे भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा प्रचार अजूनही सुरू असल्याचं दिसत आहे. दक्षिण मुंबईतून नेमका कोण उमेदवार (Mahayuti Seat Sharing) निश्चित होणार, हा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा (Maharashtra Election) मतदार संघात भाजपच्या इच्छुक उमेदवारांचे मतदारसंघात भेटीगाठींचे सत्र सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या भेटीगाठी सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत शिवडी येथे मंडळांना भेटीगाठी दिल्या आहेत.

महायुतीने मुंबईमधील काही मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. यामध्ये दक्षिण मुंबईच्या जागेचाही समावेश आहे. परंतु, आता महायुतीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचा पेच आणखीनच वाढला (Mahayuti Seat Sharing Issue) आहे. दक्षिण मुंबईतून नेमका कोण उमेदवार निश्चित होणार, हा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

निवडणुकीची (Lok Sabha 2024) घोषणा झाल्यापासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या राहुल नार्वेकरांनी तयारी सुरू केल्याचं दिसच होतं. तसंच भाजपचेच मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची देखील या ठिकाणी चर्चा होती. आता शिवसेनेच्या यामिनी जाधव याचं नाव या जागेसाठी निश्चित मानलं जात आहे, परंतु महायुतीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेसी (Mumbai Lok Sabha) नाही.

यामुळे दक्षिण मुंबईतून नेमका कोण उमेदवार निश्चित होणार? हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचा पेच आणखीनच वाढल्याचं दिसत आहे. या जागेचा तिढा सुटत नसल्याचं चित्र (Maharashtra Politics) आहे. आता महायुतीमध्ये यामिनी जाधव (Yamini Jadhav), राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा या तीन उमेदवारांच्या नावाची दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघासाठी चर्चा होत आहे. आता यापैकी कुणाला उमेदवारी मिळणार? याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं (Lok Sabha Election) आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

SCROLL FOR NEXT