Dhule News: अवैधपणे गर्भपात करण्यासाठी औषध विक्री करणाऱ्या डॉक्टरचा भांडाफोड

Illegal Abortion Drugs : धुळ्यातील मोहाडी उपनगर परिसरात अवैध गर्भपात करण्यासाठी औषध विक्री करणाऱ्या डॉक्टरचा आरोग्य विभागाच्या टीमने सापळा रचून भांडाफोड केला आहे.
Dhule News
Illegal Abortion Drugs
Published On

भुषण अहिरे, साम प्रतिनिधी

धुळ्यातील मोहाडी उपनगर परिसरात अवैध गर्भपात करण्यासाठी औषध विक्री करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आलीय. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे शैल्यचिकित्सकांकडे तक्रार केल्यानंतर आरोग्य विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने तब्बल 11 दिवस सापळा रचून आरोग्य विभागाने संबंधित डॉक्टरवर कारवाई केली आहे.

कारवाईत मोठ्या प्रमाणात अवैधपणे गर्भपात करणारे औषध सामग्री आरोग्य विभागाला आढळून आली आहे, या कारवाईमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पत्र मिळताच सापळा रचला, आणि डुबलीकेट गर्भवती महिला व तिचे नकलीपती या डॉक्टरकडे पाठवण्यात आले व आम्हाला गर्भपात करायचा आहे असे म्हणून आम्हाला औषध द्या अशी मागणी या डुप्लिकेट दांपत्याने संबंधित डॉक्टरांकडे केली, यावेळी संबंधित डॉक्टरने त्यांना ठराविक वेळी येऊन औषध घेऊन जा असे सांगितले.

डॉक्टर एका दाम्पत्याला औषध सांगत असताना आरोग्य विभागाने सापळा रचून रंगेहाथ डॉक्टरला पकडले आहे. भानुदास पाटील असे डॉक्टरचे नाव आहे. मोहाडी पोलिसांनी संबंधित डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता मोहाडी पोलिसांतर्फे या डॉक्टरवर पुढील कारवाई करण्यात येत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com