Nashik Lok Sabha Election Constituency Akhil bhartiya Samata Parishad Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election: नाशिक लोकसभा मतदारसंघात अवघ्या २४ तासात नवा ट्वीस्ट; समता परिषदेने घेतली नवी भूमिका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत सोनवणे

नाशिक : Nashik Lok Sabha Election Constituency Akhil bhartiya Samata Parishad: राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये नाशिक मतदारसंघात अवघ्या २४ तासात नवा ट्विस्ट पाहायला मिळायला. अखिल भारतीय समता परिषदेचे दिलीप खैरे यांनी अखेरच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतलीय. खैरे यांनी माघार घेतल्याने महायुतीसमोरील टेन्शन कमी झालंय.

राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये नाशिक मतदारसंघातील निवडणूक रोचक होताना दिसतेय. या मतदारसंघात दररोज नवनवीन घडामोडी घडतायेत. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवारी देत पुन्हा एकदा संधी देण्यात आलीय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हेमंत गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र समता परिषदेकडून उमेदवारीचा दावा केला जात असल्याने महायुतीचं टेन्शन वाढलं होतं. आज अखेर दिलीप खैरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं महायुतीचं टेन्शन मिटलंय.

दिलीप खैरे हे भुजबळांचे कट्टर समर्थक आहेत. छगन भुजबळांच्या सूचनेनुसार आपण अर्ज न भरण्याचा निर्णय घेतल्याचं खैरे यांनी आपल्या पत्रातून म्हटलंय. नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मी उमेदवारी अर्ज घेतला होता. मात्र आमचे श्रद्धास्थान आणि देशातील तमाम ओबीसींचे नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार मी माझा उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आहे.

सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतून मी माघार घेत आहे. खैरे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. दिलीप खैरे हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीसपदाचा कारभार देखील खैरे यांच्याकडे आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. जागावाटपाचा हा तिढा आजअखेर एका महिन्यानंतर सुटलाय. नाशिक मतदारसंघाकडून महायुतीकडून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शिवसेना पक्षाकडून सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करत हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT