Maharashtra Election Kolhapur Loksabha Satej Patil Saam Tv
लोकसभा २०२४

Kolhapur Politics: सावध राहा! नाहीतर ते फोटो व्हायरल करेन; सतेज पाटलांचा संजय मंडलिक यांना इशारा

Satej Patil: कोल्हापुरातील लोकसभा निवडणूक रंगत होणार आहे. संजय मंडलिक यांच्या टीकेला सतेज पाटील यांनी उत्तर दिलंय. पाटील यांनी संजय मंडलिक यांना पराभूत करू असा दावा आपल्या इशाऱ्यातून केलाय. आमच्यावर बोला. आम्ही राजकारणात कसलेले पैलवान आहोत. शाडू मारून मैदानात उतरलोय पुढच्याला कुणाला घाबरत नाही,असं पाटील म्हणालेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रणजीत माजगावकर ,

Maharashtra Election Kolhapur loksabha Satej patil: कोल्हापूर : मी संजय मंडलिक यांना सातत्याने सांगत आहे, गादीवर बोलू नका. बंटी पाटलावर बोला काही अडचण नाही. तुम्हाला उत्तर द्यायला हा पाटील खंबीर आहे. शाहू महाराजांचा सन्मान राखा तुम्ही सावध राहा. नाहीतर ते फोटो व्हायरल करेन, असा इशारा सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांना दिलाय.

राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा निवडणुकीपैकी एक असेलल्या कोल्हापूरच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेय. कोल्हापूमध्ये शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. शाहू महाराज आणि खासदार संजय मंडलिक थेट लढत होणार आहे. मंडलिक यांनी आपल्या प्रचारसभेत थेट शाहू महाराज यांच्यावर टीका केली होती. मंडलिक यांच्या टीकेला सतेज पाटील यांनी उत्तर दिलं असून त्यांना इशारा दिलाय. काही दिवसापूर्वी संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्यावर टीका केली होती. त्यावरून सतेज पाटील यांनी त्यांना त्यांचे फोटो व्हायरल करण्याचा इशारा दिलाय.

कोल्हापूरच्या गादी बद्दल काही लोकप्रश्न करत आहेत. मी संजय मंडलिक यांना सातत्याने सांगत आहे, गादीवर बोलू नका. बंटी पाटलावर बोला काही अडचण नाही. तुम्हाला उत्तर द्यायला हा पाटील खंबीर आहे. शाहू महाराजांचा सन्मान राखा तुम्ही सावध राहा. ज्यावेळी २०१९ ला निवडणुकीला उभा होता त्यावेळी महाराजांच्या पाया पडायला गेला होता. महाराजांच्या पाया पडतानाचे फोटो माझ्याकडे आहेत, ते फोटो व्हायरल करेन, मग अडचण होईल त्यामुळे सन्मान राखा असा सल्ला सतेज पाटील यांनी दिलाय.

पाटील यांनी संजय मंडलिक यांना पराभूत करू असा दावा आपल्या इशाऱ्यातून केलाय. आमच्यावर बोला. आम्ही राजकारणात कसलेले पैलवान आहोत. शाडू मारून मैदानात उतरलोय पुढच्याला कुणाला घाबरत नाही. माती एकदा अंगावर घेतली तर पुढच्याला चितपट केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं पाटील म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चंद्रकांत पाटलांचा निकटवर्तीय समीर पाटीलचा निलेश घायवळसोबत फोटो; रवींद्र धंगेकरांनी थेट पुरावाच दाखवला|VIDEO

Maharashtra Live News Update : धरणगावच्या आश्रमशाळेतील 15 हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण

ST Bus: दीपोत्सवाची एसटीकडून तयारी, पुण्यातून ५९८ अतिरिक्त बस, कुठून सुटणार एसटी?

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅप वापरुन बना श्रीमंत! दरमहा लाखो रुपये कमवण्याचे ५ स्मार्ट मार्ग, एकदा नक्की पाहा

Mumbai Gateway Ferry Closed : गेटवे ते मांडवा बोटसेवा बंद! काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT