Hingoli Loksabha Election 
लोकसभा २०२४

Maharashtra Election: हिंगोलीत महायुतीला तडा जाण्याची शक्यता; भाजप-शिवसेना आमनेसामने

Bharat Jadhav

Hingoli Lok sabha Election Clash In Mahayuti :

हिंगोलीमधून हेमंत पाटील यांना बाजुला सारत शिवसेनेने बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिलीय. मात्र या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराने देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्याने हिंगोलीत महायुतीला तडा जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेत्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं आमदार संतोष बांगर यांनी भाजपला इशारा दिलाय.(Latest News)

हिंगोली लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे, महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या बाबूराव पाटील कदम यांच्याविरोधात भाजपच्या नेत्यांनी मोठी बंडखोरी केली आहे. यामध्ये भाजपचे लोकसभा संघटक रामदास पाटील, भाजप नेते योगी श्याम भारती महाराज, आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठविधीज्ञ व भाजपचे नेते शिवाजी जाधव यांचा समावेश आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

दरम्यान या बंडखोराच्या बाबतीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडालीय. भाजपमधील बंडखोरी केलेल्या नेत्यांशी माझे बोलणे झाले आहे, मात्र पक्षाचे आदेश आल्याशिवाय आम्ही बंडखोरी मागे घेणार नाही असं बांगर म्हणालेत.

बांगर यांच्या या विधानाने हिंगोली लोकसभेत शिवसेनेने भाजपला जागा न सोडल्याने भाजपनेच नेत्यांना बंडखोरी करायला लावलं काय अशी चर्चा आता सुरू झालीय. तर दुसरीकडे आणि अपक्ष उमेदवारी जिंकून येण्यासाठी दाखल केली आहे. आमचा विजय निश्चित आहे म्हणत या बंडखोरी केलेल्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास स्पष्ट नकार दिलाय. यावरुन हिंगोलीत महायुतीत काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान शिवसेना शिंदे गटाने काही दिवसांपूर्वीच लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. शिंदे गटाने एकूण ८ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. हिंगोलीमधून हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर हेमंत पाटील यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला. मात्र आठवड्याभरातच आता हेमंत पाटील यांचे नाव मागे घेण्यात आलं आणि बाबूराव बाबूराव कदम कोहळीकर यांनी उमेदवारी देण्यात आली. पाटील यांची उमेदवारी रद्द केल्याने ते वेगळा निर्णय घेणार का असं वाटत होतं. परंतु आता हिंगोलीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT