Kalyan Lok Sabha : ठरलं तर..! कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी; फडणवीसांची घोषणा

Kalyan Constituency : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये कल्याणची जागा कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू होती. शिवसेना शिंदे गटाच्या दोन याद्या जाहीर झाल्या होत्या मात्र यात कल्याणचे नाव नव्हते त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं.
Kalyan Lok Sabha
Kalyan Lok SabhaSaam TV

Devendra Fadnavis On Shrikant Shinde :

कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये कल्याणची जागा कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू होती. शिवसेना शिंदे गटाच्या दोन याद्या जाहीर झाल्या होत्या मात्र यात कल्याणचे नाव नव्हते त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता देवेंद्र फडणवीसांनी स्वत: आम्ही श्रीकांत शिंदेंना निवडून आणणार असं मोठं वक्तव्य केलं आहे.

Kalyan Lok Sabha
BJP Manifesto 2024: भाजपने जाहीरनामा समिती केली जाहीर; राजनाथ सिंह असतील अध्यक्ष, समितीत या बड्या नेत्यांचाही समावेश

आज भाजपचा स्थापना दिन आहे. त्यानिमित्त नागपूरमध्ये एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांनी ही घोषणा केली. "भाजपकडून श्रीकांत शिंदे यांना विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप पूर्ण ताकदीने श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे. मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना महायुती निवडून आणेल.", असं देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं.

सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, औरंगाबाद, पालघर, कल्याण, नाशिक आणि ठाणे या काही जागांबाबत महायुतीमध्ये तिढा आहे. अशात आता हा तिढा लवकरच पूर्णत:सुटणार अशी चिन्हे दिसत आहे. ठाण्यासह कल्याण आम्हालाच हवे, असा मुख्यमंत्री शिंदेंचा आग्रह आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीसांनी स्वत: कल्याणसाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली आहे.

कल्याणमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा दरेकर आहेत. २ दिवसांआधीच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याणमध्ये दरेकर विरोधात शिंदे अशी लढत पाहायला मिळणार आहे.

Kalyan Lok Sabha
Kalyan Breaking News: कल्याणमधील वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; पत्रिपुलाजवळील रस्त्याचे काम करण्याचे महापालिकेकडून निर्देश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com