अभिजीत देशमुख, कल्याण
कल्याण शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याण शीळ रोड रस्त्यावरील पत्रीपुलाच्या पश्चिमेकडील बाजूस रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु करण्यात आलंय. या कामामुळे रस्त्याची बाजू खोदण्यात आल्याने परिसरात मोठी वाहतूककोंडी होत आहे. रस्त्यावरील वाहतूककोंडी मिटविण्यासाठी हे कामकाज युद्धपातळीवर करा, असे निर्देश महापालिकेकडून देण्यात आले आहे.
कल्याण शहरातील वाहतूक कोंडी फुटण्याऐवजी वाढतच आहे. कल्याण शीळ रस्त्यावरील पत्रीपुलाच्या पश्चिमेकडील बाजूस रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. रस्त्याची एक बाजू खोदण्यात आल्याने पुलावर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठी कोंडी होत आहे.
भर उन्हात आणि परीक्षेच्या काळात वाहने तासंतास कोंडीत अडकून पडत आहे. तर यामुळे वाहनचालक बेजार झाले आहेत. याबाबत आता केडीएमसीने एमएसआरडीसीला पत्रिपुलालगतच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर करा, त्यासाठी मनुष्यबळ वाढवा. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांना हा रहदारीचा रस्ता असल्याने या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करण्यासंदर्भात सूचना दिल्याचे शहर अभियंत्या अनिता परदेशी यांनी सांगितले.
तत्पूर्वी, कल्याण शीळ या मार्गावर 24 तास वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावरील पत्रीपुलालगत कल्याणच्या दिशेने रस्त्यांच्या कॉक्रीटीकरणाचे काम एमएसआरडीसीकडून सुरू करण्यात आले आहे. यासाठी एका बाजूने रस्ता खोदण्यात आला आहे.
गोविंदवाडी बायपासकडून येणारी वाहने, कल्याणकडून डोंबिवली किंवा शीळ मार्गाकडे जाणारी आणि येणारी वाहने एकाच वेळी या ठिकाणी अडकून पडत आहेत. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे या वाहतूककोंडीत भर पडत आहे.
वाहतुकीच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करण्याबाबत ,उपायोजना करण्याबाबत सूचना करण्यात आल्याची माहिती शहर अभियंत्या अनिता परदेशी यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.