विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी महाविकास आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची मुलाखत घेतली आहे. दानवेंनी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत संवाद साधला आहे. महाविकास आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रोड शो पार पडला. त्यावेळी त्यांनी सामसोबत संवाद (Ambadas Danve Interview With Chandrakant Khaire) साधला आहे.
रोड शो दरम्यान अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची मुलाखत घेतली आहे. यावेळी अंबादास दानवे यांना मी तुमची मुलाखत सामसाठी घेत असल्याचं म्हटलं आहे. आज भव्यशोभा यात्रा निघाली आहे. ही शोभायात्रा विजयाची खात्री देत आहे, असं तुम्हाला वाटतं का?असा सवाल दानवेंनी खैरेंना केला होता. यावर खैरेंनी शंभर टक्के खात्रीच आहे. हा विजय माननीय उद्धवजी ठाकरे यांचा आणि संपूर्ण महाविकास आघाडीचा असल्याचं खैरेंनी म्हटलं (hhatrapati Sambhajinagar) आहे.
महाविकास आघाडीची साथ आदरणीय शरद पवार, राहुलजी यासगळ्यांनी दिली आहे. तर अंबादास दानवे यावेळी म्हणाले की, आतापर्यंत फक्त राजकीय पक्ष सहभागी झाले आहेत. जनता येणार आहेत, असं मला वाटतं (MVA Road Show In Chhatrapati Sambhajinagar) आहे. यावर खैरेंनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हो जनताही यायला लागली आहे. आपल्याला लोळवायचं एमआयएमला की गद्दारांना असं दानवेंनी खैरेंना विचारला, तेव्हा चंद्रकांत खैरे म्हणाले की, गद्दार मेला. परंतु इम्तियाज जलीले ज्या जाळपोळ, दंगली घडवून आणल्या त्यांना साफ करायचं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंनी सुरू केलेली विकासाची परंपरा यांनी खंडित केल्याचं यावेळी खैरे म्हणाले (Lok Sabha) आहेत. मजबूतीने आपण या जिल्ह्याचा विकास करू या. देशावर महाविकास आघाडीचं राज्य येणार आहे. त्यामुळे आता आपल्याला काही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी सामसोबत बोलताना व्यक्त (Maharashtra Election) केला आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.