Maharashtra Election 2024 Sanjay Raut Warn Congress On Sangli Lok Sabha Seat Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Election 2024: सांगलीवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली, संजय राऊतांचा थेट इशारा

Sangli Lok Sabha Election 2024 News: संजय राऊत यांनी सांगलीत कोणी मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करू नये, असा गंभीर इशारा काँग्रेसला दिला आहे. इथे विरोध केला तर जर त्याचे पडसाद राज्यातील 48 जागावर उमटतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Sandeep Gawade

Sanjay Raut Warn Congress

सांगली लोकसभेच्या जागेवरून सध्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात घमासान सुरू आहे. जागा वाटपाचा तिढा कायम असताना शिवसेनेने चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र सांगलीच्या जागेवर काँग्रेससने दावा केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी सांगलीत कोणी मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करू नये, असा गंभीर इशारा काँग्रेसला दिला आहे. इथे विरोध केला तर जर त्याचे पडसाद राज्यातील 48 जागावर उमटतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले,नाना पटोले म्हणतात त्या प्रमाणे मी सांगलीची परिस्थिती पाहण्यासाठीच आलोय आणि इथे शिवसेनेचा उमेदवार लढणंच योग्य आहे असं मला वाटतं. सांगलीसह महाराष्ट्रत 48 पैकी 35 पेक्षा अधिक जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. आघाडी किंवा युतीत एखाद्या जागेवरून वाद होतोच. सांगलीतील काँग्रेस नेत्याची एक वेगळी भूमिका आहे, त्या भूमिकेचा मी आदर करतोय.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेने लढावी ही चर्चा झाली आहे. सांगली लोकसभेची सगळीकडे चर्चा आहे. मात्र सांगलीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटीलच दिल्लीत जाणार आहेत. मविआ सरकार पाडल्यामुळे जनतेत सगळीकडे रोष आहे. भाजपचा 400 पारचा नारा फसवा आहे हे निकालानंतर जनतेला कळेलचं. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, पुन्हा भाजप सतेत येणार नाही हा जनतेचा मानस असल्याचं ही ते म्हणाले.

शिवसेनेने मित्र पक्षांना विचारात न घेता सांगलीची उमेदवारी जाहीर केली- शरद पवार

सातारा आणि माढा दोन्ही ठिकाणचे उमेदवार दोन दिवसात घोषित केले जातील. महाविकास आघाडीतून ⁠साताऱ्यातील जागा आम्ही सोडणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तुतारी चिन्हावर लढणार असतील तर पृथ्वीराज चव्हाण यांचा विचार होऊ शकतो, मात्र ते काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यास इच्छुक आहेत. ⁠सांगलीतील उमेदवारी शिवसेनेने मित्र पक्षांना विचारात न घेता परस्पर जाहीर केली. परंतु आता त्यात बदल होईल असं वाटत नाही. ⁠भिवंडीतील उमेदवारी आम्ही इतरांशी चर्चा करून ठरवली, अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

SCROLL FOR NEXT