Maharashtra Election 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Election 2024 : मोहिते पाटील-निंबाळकरांचं ठरलं! कोणत्या चिन्हावर लढणार निवडणूक? कोणाला मिळणार उमेदवारी?

Lok Sabha Election 2024 : सहकारी संस्था आणि त्यावरील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी मोहिते पाटील यांच्या ऐवजी संजीव राजे निंबाळकर माढ्यामधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Election 2024

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांचा तिढा कायम आहे. यासाठी महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली आहे. मात्र माढा मतदारसंघातून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. या मतदासंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असतानाच शरद पवार यांनी आज माढाच्या जागेसंदर्भात संकेत दिले आहेत. सहकारी संस्था आणि त्यावरील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी मोहिते पाटील यांच्या ऐवजी संजीव राजे निंबाळकर माढ्यामधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

मोहिते पाटील - निंबाळकरांचे ⁠दोन्ही कुटुंबं तुतारी हातात घेणार आहेत. केवळ उमेदवारी घोषणेची केवळ औपचारीकता बाकी आहे. ⁠उमेदवार मोहिते पाटील यांच्या घरातील असणार की रामराजे निंबाळकर यांच्या घरातील असणार यावर चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन्ही घराण्यांना आपापसात चर्चा करून उमेदवार ठरवण्याचा सल्ला⁠ देण्यात आला आहे. मोहिते पाटील यांच्या घरातून धैर्यशील मोहिते पाटील तर रामराजे निंबाळकर यांच्या घरातून संजीव राजे निंबाळकर माढा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र सहकारी संस्था आणि त्यावरील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी मोहिते पाटील यांच्या ऐवजी संजीव राजे निंबाळकर माढ्यामधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता असल्याचीही चर्चा आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

⁠सातारा आणि माढा दोन्ही ठिकाणचे उमेदवार दोन दिवसात घोषित केले जातील. महाविकास आघाडीतून ⁠साताऱ्यातील जागा आम्ही सोडणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तुतारी चिन्हावर लढणार असतील तर पृथ्वीराज चव्हाण यांचा विचार होऊ शकतो, मात्र ते काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यास इच्छुक आहेत. ⁠सांगलीतील उमेदवारी शिवसेनेने मित्र पक्षांना विचारात न घेता परस्पर जाहीर केली. परंतु आता त्यात बदल होईल असं वाटत नाही. ⁠भिवंडीतील उमेदवारी आम्ही इतरांशी चर्चा करून ठरवली, अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

Maharashtra Live News Update: श्रीरामपूरमध्ये हॉटेलवर छापा; घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर उघड, 10 सिलिंडर जप्त

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

SCROLL FOR NEXT