मयुर राणे, ता. १३ मे २०२४
लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप होत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच खळबळजनक आरोप करताना नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांनी १२ ते १३ कोटी रुपये वाटल्याचा दावा केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"काल रात्रीपासून पैशाचं वाटप देवाणघेवाण होत आहे, हे समोर आलेले चित्र आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्री २ तासांसाठी आले. यावेळी ते जड जड बॅगा घेऊन उतरताना दिसत आहेत. त्या बॅगा कसल्या आहेत? कोणाला वाटप केले? आमच्या गाड्या तपासतात, हेलिकॉप्टर होतात. मग मुख्यमंत्री, प्रधानमंत्र्यांच्या गाड्या कोण तपासणार?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
"ईडी ही नरेंद्र मोदींची गँग आहे. हे पैशांचे वाटप ईडीला दिसत नाही का? महाराष्ट्रामध्ये पैशाचा पाऊस पडतोय. तो कितीही पाडला तरी नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित आहे. बारामतीमधील बँक सकाळपर्यंत उघड्या होत्या. नाशिकमधील व्हिडिओ मोठा पुरावा आहे. त्या हेलिकॉप्टरमधून नऊ बॅगा उतरल्या. १२- १३ कोटी रुपये वाटले," असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला.
"छत्रपती शाहू महाराज यांचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे हे किमान 15 ते 20 दिवस हॉटेलमध्ये थांबले होते. आम्ही त्यांना सर्वांनी पाठिंबा दिला आणि त्यांचा पराभव करण्यासाठी हे महाशय हॉटेल शालीमारला उतरले होते. त्यांनी पैशाचा वाटप केलं तरी शाहू महाराज विजय होत आहेत," असा विश्वासही यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.