Baramati Loksabha Elecation Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashatra Election: बारामतीतून शरद पवार यांना उमेदवारी; 'या' संघटनेकडून मिळाली संधी

Baramati Loksabha Elecation : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे असून आता बारामतीमधून भारतीय गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या शरद पवार यांना उमेदवारी दिलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सागर आव्हाड, बारामती)

Sharad Pawar Candidature from Baramati constituency :

बारामती : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे हे वाहू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे असून आता बारामतीमधून भारतीय गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या शरद पवार यांना उमेदवारी दिल्याने आत्ता या रिक्षाचालक शरद पवार यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून शरद पवार यांच्यासहित पुणे जिल्ह्यात ४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यात बारामतीमधून रिक्षाचालक शरद पवार यांना तर पुणे लोकसभा मतदार संघातून टेम्पो चालक मनोज वेताळ,मावळमधून कॅब चालक संतोष वालगुडे आणि शिरूर मधून फूड डिलिव्हरी बॉय स्वप्नील लोंढे यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारांच्या प्रचारार्थ १८ एप्रिल २४ रोजी प्रचार सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करून बारामतीच्या उमेदवार शरद पवार यांचा अर्ज भरण्यात येणार आहे.

याबाबत अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर म्हणाले, व्यवसायातील गीग वर्कर्स यांच्या मागण्यांबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने गांभीर्य न दाखवल्यामुळे, आम्ही मतदानाद्वारे आमचे आंदोलन मतपेटीतून पुढे नेत आहोत. या चार लोकसभा मतदारसंघातील, ४ लाख गिग वर्कर्स व त्यांचे १६ लाख कुटुंबीय आमच्याच उमेदवारांना मतदान करून आमची ताकद आम्ही राजकीय पक्षांना दाखवून देऊ.

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे शरद पवार हे राहत असून गेली ५ ते ६ वर्षापासून ते रिक्षा चालवत आहे.आत्ता ते बारामतीच्या रिंगणात उतरले असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सारखं त्यांचं नाव असल्याने त्यांची विशेष अशी चर्चा होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT