Vijay Shivtare Saam Tv
लोकसभा २०२४

Vijay Shivtare News: विजय शिवतारेंचें बंड शमले! 'पुरंदरच्या तहा'ची आठवण सांगत निवडणुकीतून माघार

Maharashtra Loksabha News: कार्यकर्त्यांशी झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. पुढच्या पिढ्यांचे नुकसान टाळण्यासाठी माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, पुणे|ता. ३० मार्च २०२४

Baramati Loksabha Constituency News:

बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार नसल्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. त्यामुळे महायुतीमधील बारामती लोकसभेचा तिढा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. आज कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी निवडणूकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. (Maharashtra Loksabha News)

बारामती लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या विजय शिवतारे यांनी बंडखोरी करत बारामतीमधून लोकसभा लढवणार असल्याची घोषणा केली होती. विजय शिवतारे यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), शंभूराज देसाई यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.

अखेर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांची नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात येत होते. अखेर आज कार्यकर्त्यांशी झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. पुढच्या पिढ्यांचे नुकसान टाळण्यासाठी माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले विजय शिवतारे?

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही मी माघार घेण्यास तयार नव्हतो. मी माघार घेत नसल्याने मुख्यमंत्री शिंदे माझ्यावर रागावले होते. मात्र आता गुंजवणीचे पाणी पुरंदरला देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मोदींना पंतप्रधान करण्यासाठी माघार घेत आहे," असे विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी सांगितले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT