Hingoli Crime News : हिंगोलीत अल्पवयीन मुलीची छेड; दोन गटांत तुफान राडा, घरांवर दगडफेक

Crime News : दगडफेक झालेल्या परिसरात हिंगोली पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी दिला आहे.
Hingoli Crime News
Hingoli Crime NewsSaam tv

Hingoli News :

हिंगोली शहरात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या रागातून दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. या घटनेनंतर दोन्ही गट आमने-सामने आल्याने प्रचंड दगडफेक झालीये. काल रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Hingoli Crime News
Hingoli News: घरगुती हिंसाचाराला कंटाळून महिला पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, पोलीस मुख्यालयातच केला आत्महत्येचा प्रयत्न

मच्छी मार्केट आणि इंदिरा चौक परिसरात अनेक घरात दगडफेक सुरू होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हिंगोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

या संपूर्ण दगडफेकीच्या घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. परिसरातील अन्य नागरिकांनी देखील ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. पोलिसांनी हे व्हिडिओ पाहून पुढील तपासाला सुरूवात केली आहे.

दरम्यान, हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चार ते पाच जणांविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा देखील समावेश आहे.

दगडफेक झालेल्या परिसरात हिंगोली पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी दिला आहे.

तरुणीसाठी पुण्यात भरदिवसा थरारक घटना

पुण्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. येथे एका मुलीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयाने दोन मित्र एकमेकांच्या जीवावर उठले होते. भररस्त्यात शंकर मिरेकर आणि किशोर धोत्रे यांनी एकमेकांवर कोयता तसेच अन्य धारदार शस्त्रांनी वार केलेत. या भांडणात दोघेही गंभीर जखमी झाले. पोलिसांनी वेळीच धाव घेत प्रकरण शांत केले आहे.

Hingoli Crime News
Pune Crime News : कोयत्याने वार, २ तरुण रक्तबंबाळ! तरुणीसाठी पुण्यात भरदिवसा थरारक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com