Hingoli News: घरगुती हिंसाचाराला कंटाळून महिला पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, पोलीस मुख्यालयातच केला आत्महत्येचा प्रयत्न

Woman Police Officer Commit To End Life: हिंगोलीमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस मुख्यालयातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Woman Police Officer Commit To End Life
Woman Police Officer Commit To End LifeYandex

Hingoli Crime News

हिंगोलीमध्ये (Hingoli) एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस मुख्यालयातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पोलीस कर्मचारी महिलेने पोलीस मुख्यालयातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न (Woman Police Officer Commit To End Life) केल्याचं समोर आलं आहे. आपण या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या.  (Latest Crime News)

कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात योग्य न्याय मिळत नाही, असा आरोप करत या महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस मुख्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. वैशाली बबनराव थोरात, असं या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नांदेड पोलीस दलात थोरात या कर्तव्य बजवत असल्याची माहिती हिंगोली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे वैशाली थोरात यांच्या विरोधात आता शहर पोलिंसात गुन्हा दाखल करण्यात (Hingoli Crime News) आला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

देशभरामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत आहे. आता हिंगोलीमध्ये कौटुंबिक हिंसाचारामुळे पोलीस महिला कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना 22 मार्च रोजी या दुपारी (Woman Police Officer) घडली. हिंगोलीच्या पोलीस मुख्यालयातील भरोसा सेलमध्ये वैशाली बबनराव थोरात या महिला पोलीस कर्मचाऱ्याने पतीच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण दाखल केले होते.

भरोसा सेलमधील महिला पोलीस अधिकारी वैशाली थोरात यांच्या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. तेव्हा अचानकपणे आपल्याला न्याय मिळत नाही. माझ्या पतिविरोधात गुन्हा दाखल (Domestic Violence) करा, असं म्हणत वैशालीने सोबत आणलेले विषारी औषध (Poisoning) प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

Woman Police Officer Commit To End Life
Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीशी अनैतिक संबंधांचा संशय, पोलिसानेच व्यापाऱ्याला गोळी झाडून संपवले; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

पतीसोबत वाद

मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी वैशाली थोरात यांना औषध प्राशन करण्यापासून रोखत तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या वैशाली थोरात यांच्यावर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू ( Crime News) आहेत. या घटनेप्रकरणी त्यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वैशाली बबनराव थोरात या नांदेड पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कर्तव्य बजावत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या पतीसोबत त्यांचा वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Woman Police Officer Commit To End Life
Pune Crime News : वॉशिंग मशीन विकायला गेला आणि गमवून बसला दीड लाख रुपये; पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com