ranjitsinh naik nimbalkar , ramraje naik nimbalkar, satara , phaltan saam tv
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024: अखेर माढ्याचा तिढा सुटला! देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी मध्यस्थी; रामराजेंचा विरोध मावळला?

Maharashtra Politics: माढ्याच्या उमेदवारीवरुन महायुतीत सुरू असलेला संघर्ष मिटल्याची माहिती मिळत आहे. आज रामराजे नाईक निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Gangappa Pujari

सूरज मासुरकर, मुंबई|ता. १९ मार्च २०२४

Madha Loksabha Election:

माढ्याच्या उमेदवारीवरुन महायुतीत सुरू असलेला संघर्ष मिटल्याची माहिती मिळत आहे. आज रामराजे नाईक निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी एक पाऊल मागे घेत वाद मिटल्याचे संकेत दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदार संघातील उमेदवारीवरुन महायुतीत संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपकडून (BJP) माढ्याची उमेदवारी रणजितसिंह निंबाळकर यांना जाहीर झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्याला विरोध केला होता. तसेच अकलूजचे विजयसिंह मोहित पाटील यांनीही नाराजी दर्शवली होती.

याच पाश्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मोहित पाटील यांच्या निवासस्थानी सर्व विरोधकांची बैठकही झाली होती. या बैठकीत धैर्यशील मोहिते पाटील हे बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. अखेर या नाराजीबाबत मुंबईमध्ये आज महत्वाची बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर या बैठकीला होते. यामध्ये रामराजे यांची नाराजी दूर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

शिंदे गट १४ जागा लढणार?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपासंदर्भात बैठका सुरू आहेत. भाजपने महाराष्ट्रातील २० जागा जाहीर केल्या तरी शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र आज शिंदे गट १४ जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी १२ जागांवरील संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT