madha lok sabha election Big Blow To BJP dhairyshil mohite patil resigned from bjp party  Saam TV
लोकसभा २०२४

Madha Lok Sabha: माढ्यात भाजपला मोठा धक्का, धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला राजीनामा

Dhairyashil Mohite Patil: ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Satish Daud

Madha Lok Sabha Election 2024

ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले होते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार, अशा चर्चा रंगल्या होत्या.

दरम्यान, गुरुवारी (ता. ११) धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले होते. शरद पवार यांच्या भेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुरुवारी मध्यरात्रीच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

हा भाजपला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाची मोठी डोकेदुखी होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी एकेकाळी राष्ट्रवादी आणि मोहिते पाटलांचा बालेकिल्ला होता. मात्र, त्यानंतर या मतदारसंघावर भाजपने आपलं वर्चस्व ठेवलं. आता हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी शरद पवारांनी भाकरी फिरवली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT