Abhijit Patil Supports BJP Yandex
लोकसभा २०२४

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

Madha Lok Sabha Constituency Update: माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Rohini Gudaghe

भरत नागणे, साम टिव्ही पंढरपूर

माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात (Madha Lok Sabha Constituency) मोठी अपडेट समोर आली आहे. पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी १ मेच्या रात्री भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पंढरपुरातील (Pandharpur) निष्ठावंत मोहरा भाजपच्या गळाला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीगाठी वाढल्या होत्या. तेव्हापासून अभिजीत पाटील भाजपमध्ये प्रवेश (Abhijit Patil Supports BJP) करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी अखेर भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. रात्री पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली (Pandharpur NCP Leader Abhijit Patil) होती. या बैठकीमध्ये त्यांनी माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा जाहिर केला आहे. अभिजीत पाटील यांनी पाठिंबा जाहीर केल्याने पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला (Maharashtra Election 2024) आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने जप्तीची कारवाई केली आहे. ही कारवाई मागे घ्यावी, यासाठी अभिजीत पाटील (Abhijit Patil)) यांनी चार दिवसांपूर्वी सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. भेटीमध्ये फडणवीस यांनी कारखान्याला मदत करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी रात्री भाजपला पाठिंबा जाहिर केला आहे.

अभिजीत पाटील यांच्या पाठिंब्यामुळे माढ्यात निंबाळकरांचे बळ वाढले आहे. माझी राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून केवळ साखर कारखाना जिवंत राहिला पाहिजे. सोलापूर जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा अशीच पुढे चालू राहिली (Maharashtra Politics) पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला पाहिजे, यासाठी राजकीय भूमिका घेतल्याचं अभिजीत पाटील यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

SCROLL FOR NEXT