Loksabha Election 
लोकसभा २०२४

Loksabha Election: पक्षफुटीचं राजकारण कोणाला भोवणार? सहानुभूतीची लाट,कोणाला ताप?

Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत कोणाच्या बाजुने निकाल लागेल. यावर तर्क वितर्क काढले जात आहेत. विजय खेचून नेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की उपमुख्यमंत्री अजित पवार असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांचा कस लागलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय भूकंप झाले. शिंदे, अजितदादा यांच्याकडे मूळ पक्ष आणि चिन्ह आलं . असं असलं तरी जनतेची सहानूभूती कोणत्या पक्षासोबत आहे याची उत्तरं 4 जूनला मिळणार आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की उपमुख्यमंत्री अजित पवार असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांचा कस लागणार आहे. यावरचा हा रिपोर्ट

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात दोन मोठे राजकीय भूकंप झाले.एकनाथ शिंदेंच बंड आणि अजित पवारांनी केलेला उठाव. त्यानंतर लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या.त्यात महायुती विरुद्ध मविआ अशी निवडणूक रंगली. मात्र सहानूभूतीची लाट कोणाच्या मागे जाणार हे लोकसभा निवडणुकीतील निकालात स्पष्ट होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट पडल्यानंतर राज्यात होणारी ही पहिलीच निवडणूक. त्यातच राज्यात मतदानाची टक्केवारी वाढलीय. राज्यातील सहा मतदारसंघात मतदार वाढले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कस लागणार आहे.

शिवसेना विरुद्ध शिवसेना 13 जागांवर आमनेसामने आहेत तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत 2 जागांवर होतेय...यातल्या प्रमुख लढती कुठल्या आहेत ते पाहूया.

शिवसेना विरुद्घ शिवसेना

उत्तर पश्चिम – रविंद्र वायकर ( शिवसेना ) विरुद्ध अमोल कीर्तीकर ( ठाकरे गट )

दक्षिण मध्य – राहुल शेवाळे ( शिवसेना ) विरुद्ध अनिल देसाई ( ठाकरे गट )

दक्षिण मुंबई – यामिनी जाधव ( शिवसेना ) विरुद्ध अरविंद सावंत ( ठाकरे गट )

ठाणे – नरेश म्हस्के ( शिवसेना ) विरुद्ध राजन विचारे ( ठाकरे गट )

कल्याण – श्रीकांत शिंदे ( शिवसेना ) विरुद्ध वैशाली दरेकर ( ठाकरे गट )

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी

(शरद पवार आणि अजित दादा फोटो)

बारामती – सुनेत्रा पवार ( राष्ट्रवादी ) विरुद्ध सुप्रिया सुळे ( पवार गट )

शिरुर – शिवाजी आढळराव पाटील ( राष्ट्रवादी ) विरुद्ध डॉ. अमोल कोल्हे ( पवार गट )

राज्यातील राजकीय गणितं बदलल्यानंतर काही ठिकाणी उघड नाराजी लोकांमधून उमटली. तर काही ठिकाणी या नव्या राजकीय समीकरणाचं स्वागतंही झालं. त्यात काही भागात मतदानाची टक्केवारी वाढलीये. त्यामुळे जनतेच्या मनात कुणाला सहानुभूती आहे आणि कुणाविषयी रोष आहे याच उत्तर चार जूनलाच मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT