Loksabha Election Pm Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Loksabha Election: राजकारणात आलं शेण आणि मटन; खाण्या-पिण्यावरुन तापलं निवडणुकीचं वातावरण

Loksabha Election : देशाच्या राजकारणात शेण आणि मटण यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. लालू यादव आणि राहुल गांधींच्या मटण पार्टीवरून मोदींनी टीका केलीय. यावर संजय राऊतांनी भ्रष्ट्रचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं अशी टीका केलीय. नेमकं काय आहे हा वाद पाहुयात या रिपोर्टमधून

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Loksabha Election Politics On Mutton :

लोकसभा निवडणुकीचे वारं देशभरात वाहू लागलंय. साधारण बेरोजगारी, महागाई, शिक्षा, आरोग्य, शेतकरी आत्महत्या असा निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावत सुरूय. मासे, शेण आणि मटण इथपर्यंत पोहोचलाय. विरोधक श्रावणात मटण खात असल्याची टीका देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी आणि लालू यादव यांच्यावर केलीय. (Latest News)

दरम्यान पंतप्रधान मोदींनी देशातील ज्वलंत मुद्दे सोडून मटणाच्या मुद्द्यावर ताव का मारलाय. याचं कारण आहे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधी यांचा मटन खाण्याचा व्हिडिओ. याच व्हिडिओवरून मोदींनी निशाणा साधला आणि राजकारण तापलं. यानंतर संजय राऊतांनी खास आपल्या शैलीत भाजपचा समाचार घेतलाय. दरम्यान मोदींच्या टीकेनंतर तेजस्वी यादव यांनी स्पष्टीकरण दिलंय. तो व्हिडिओ श्रावणातला नसल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलंय.

भाजपने निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचं उद्घाटन केलं. यावरून निवडणूक प्रचारात धार्मिक मुद्दे अजेंड्यावर असणार हे आधीच स्पष्ट झालं होतं. आता मोदींनी धार्मिक आस्थेवरून विरोधकांना डिवचणं कितपत फायदेशीर ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT