Minister Who Lost In Loksabha Election
Minister Who Lost In Loksabha Election Saam Tv
लोकसभा २०२४

Minister Who Lost In Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; १९ मंत्र्याचा झाला पराभव, पाहा लिस्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशात ४ जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत भाजपच्या १९ मंत्र्याचा पराभव झाला आहे. देशातील अनेक बड्या नेत्यांचा पराभव झाला आहे. त्यात स्मृती इराणींपासून रावसाहेब दानवे या नेत्यांचा समावेश आहे.

स्मृती इराणी (Smriti Irani)

अमेठीमधून स्मृती इराणींचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या कालीचरण मुंडा यांनी १ लाखांहून अधिक मतांनी स्मृती इराणींचा पराभव केला आहे.

आर के सिंह (R K Singh)

आ के सिंह यांचाही बिहारमधील आरा मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यांचा ५९८०८ मतांनी पराभव झाला आहे.

महेंद्र नाथ पांडे (Mahendra Nath Pande)

महेंद्रनाथ पांडे यांचा चंदौली मतदारसंघातून पराभव झाला आहे. समाजवादी पक्षाचे बिरेंद्र सिंह यांनी २१५६५ मतांनी त्यांचा पराभव केला आहे.

अजय मिश्रा टेनी (Ajay Mishra Teni)

उत्तर प्रगेशमध्ये राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. समाजवादी पक्षाच्या उत्कर्ष वर्मा यांनी ३४,३२९ मतांनी त्यांचा पराभव केला आहे.

साध्वी निरंजन

साध्वी निरंजन ज्योती यांचा उत्तर प्रदेशमधील फतेहपूर मतदारसंघातून पराभव झाला आहे. समाजवादी पक्षाचे नरेश उत्तम पटेल यांनी त्यांचा पराभव केला आहे.

कौशल किशोर

कौशल किशोर यांचा उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज या मतदारसंघातून पराभव झाला आहे. येथे समाजवादी पार्टीचे आर के चौधरी यांचा विजय झाला आहे.

भानूप्रताप सिंह वर्मा

उत्तर प्रदेशमधील जलौन मतदारसंघातून भानूप्रताप सिंह वर्मा यांचा पराभव झाला आहे. येथे समाजवादी पक्षाचे नारायण दास यांचा विजय झाला आहे.

रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve)

महाराष्ट्रात रावसाहेब दानवे यांना पराभवाचा सामना कराला लागला आहे. जालना मतदारसंघातून कल्याण वैजनीतराव काले हे जिंकले आहेत.

कपिल पाटील (Kapil Patil)

भारतीय जनात पार्टीचे मंत्री कपिल पाटील यांचा भिवंडी मतदारसंघातून पराभव झाला आहे. भिवंडी मतदारसंघात बाळ्या मामा म्हणजेच सुरेश गोपिनाथ म्हात्रे हे विजयी झाले आहेत.

भारती पवार

महाराष्ट्रातील डिंडोरी मतदारसंघातून मंत्री भारती पवार यांचा पराभव झाला आहे. येथे शरदचंद्र पवार गटोचे भास्कर मुरलीधर भगरे विजयी ठरले आहेत.

याचसोबत केरळमधे तिरुवनंतपुरम येथून शशी थरुर यांनी विजय मिळवत राजीव चंद्रशेखर यांचा पराभव केला आहे. केरळमध्ये व्ही मुरलीधरन यांचाही पराभव झाला आहे. राजस्थानमध्ये मंत्री कैलाश चौधरी यांचा पराभव झाला आहे. येथे उम्मेदा राम बेनीवाल यांचा विजय झाला आहे. कर्नाटकात भगवंत खुबा यांचा पराभव जाला आहे. तर तमिळनाडूत एल, मुरुगन हे पराभूत झाले आहे. तर बिहारमधून संजीय बाल्यान यांचा पराभव झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India Victory Parade| हुश्शsss.. मुंबईवरील चेंगराचेंगरीचं संकट टळलं! टीम इंडियाच्या मुंबईतील विजयी यात्रेतील गर्दी मॅनेज करण्यात यंत्रणा फेल

Drumstick Leaves Sabji Recipe: सोप्या पद्धतीनं ट्राय करा शेवग्याच्या पानांची सुकी भाजी

Marathi Live News Updates : महायुतीकडून 'मनोमिलन'; घटकपक्षांचा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात थोड्याच वेळात मेळावा

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रातील सरकार ऑक्टोबरमध्ये बदलणार'

Sanjeeda Shaikh : 'हीरामंडी' फेम संजीदा शेखच्या बॅकलेस लूकमध्ये दिलखेचक अदा

SCROLL FOR NEXT