Konkan Lokasabha Constituency  
लोकसभा २०२४

Loksabha Election: कोकण ठाकरेंच्या हातून निसटलं; कोकणात महायुतीचाच डंका

Konkan Lokasabha Constituency : ठाकरे आणि कोकण एक वेगळंच समीकरण आहे. मात्र याच कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसलाय. तर कोकणात महायुतीचाच डंका वाजतोय. मात्र दुसरीकडे नारायण राणेंनी पराभवाच्या मालिकेतून वाट काढत मोठं कम बॅक केलंय. यावरचाच हा खास रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीत कोकण जिंकण्यासाठी ठाकरेंनी जोर लावला होता. आदित्य ठाकरेंनी कोकणात खळं सभा घेत रान पेटवलं होतं. तर उद्धव ठाकरेंनीही कोकण जिंकण्यासाठी गर्जना केली होती. मात्र जाहीर झालेल्या निकालात कोकण ठाकरेंच्या हातून निसटलय.

शिवसेनेतील फुटीनंतर कोकणाची लढाई उद्धव ठाकरेंनी प्रतिष्ठेची केली होती. शिवसेनेतील फुटीनंतर कोकणात तीनच आमदार ठाकरेंसोबत राहिले. त्यामुळे ठाकरेंनी गद्दारांना धडा शिकवणार म्हणत कोकणात सभांचा धडाका लावला. मात्र त्यानंतरही कोकण ठाकरेंच्या हातून निसटलंय.

कोकणात महायुतीचा डंका

रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये नारायण राणेंनी ठाकरेंचे शिलेदार विनायक राऊतांचा पराभव केला.

रायगडमधून सुनील तटकरेंनी ठाकरे गटाच्या अनंत गितेंचा पराभव केला.

पालघरमध्ये भाजपच्या हेमंत सावरांनी ठाकरे गटाच्या भारती कामडींचा पराभव केला.

ठाण्यात विजयाचा विश्वास असलेल्या राजन विचारे यांचा शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंनी पराभव केला.

कल्याणमधून श्रीकांत शिंदेंनी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केला.

तर दुसरीकडे ठाकरेंचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या नारायण राणेंचा १० वर्षांचा निवडणुकीतला विजयाचा वनवास संपलाय. रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या उमेदवारीवरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता. शिंदे गटाकडून उदय सामंत यांचा भाऊ किरण सामंत तिकिटासाठी अडून बसले होते. मात्र अखेर राणेंनी उमेदवारी मिळवली.

त्यामुळे सामंतांच्या नाराजीचा फटका बसेल अशी शक्यता होती. मात्र राणेंनी दोन वेळा खासदार असलेल्या ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा पराभव केला. या विजयामुळे राणेंचं कोकणावरचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय. त्यामुळे आगामी विधानसभा निव़णुकीत ठाकरे विरूद्ध राणे असा जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT