Ajit Pawar-eknath Shinde  Saam TV
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : शिंदेंचा शिलेदार आज अजित पवार गटात प्रवेश करणार; शिरुर मतदारसंघात रंगत वाढली

Shirur Loksabha Election news : शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत होणार आहे. ही लढत जुनीच असली तरी राजकीय फासे मात्र उलटे पडलेत.

रोहिदास गाडगे

Pune News :

शिवसेना शिंदे गटाचे शिल्लेदार माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या उपस्थित आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहेत. आपण शिरुर लोकसभा लढणार, हे यापूर्वीच महायुतीत ठरलं होतं, असा गौप्यस्फोट आढळराव पाटलांनी केला.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत होणार आहे. ही लढत जुनीच असली तरी राजकीय फासे मात्र उलटे पडलेत. मागच्या वेळी आढळराव पाटलांचा पराभव हा अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचा झाला होता. आता पाच वर्षानंतर आढळराव पाटलांच्या साथीने अजित पवारांनी अमोल कोल्हेंच्या पराभवासाठी आखाणी केलीय. त्यामुळे आज आढळरावपाटीलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असला तरी आढळराव पाटलांची उमेदवारी आज जाहीर होणार का हेही पहावं लागणार आहे. (Latest Marathi News)

याबाबत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं की, यापूर्वीच महायुतीत ठरलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिरुर लोकसभा निवडणूक लढणार. निवडणूक ही घड्याळ चिन्हावर लढणार असल्याने पक्षप्रवेश करत आहे. 2019 आणि आता 2024 ला अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशीच लढत असली आता दोन्ही बाजू बदलल्या आहेत.

महायुतीत शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी असल्याने विजय सोपा आहे. 2019 चा पराभव विसरलो. पराभवानंतर जनतेत मिसळुन कामे केली. पराभवानंतर पुन्हा लोकसभा लढणार हे मनातही नव्हतं. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकसभा लढवण्यासाठीची संधी चालून आली, असं आढळराव पाटलांनी म्हटलं.

तीन वेळा खासदार म्हणून काम करायला मिळालं. निवडणूक लढायला मिळाली नाही तरी चालेल पण संघर्ष नकोय. यावेळी आढळराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. २०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी ताकद दिली नाही, असं त्यांनी म्हटलं. आत जनतेसाठी लढतोय. पराभवाचा बदला घ्यायला नाही तर विकासकामांसाठी माझी लढाई आहे.

नाराजी प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळत असून नाराजी आता भुतकाळात जमा झाली. अजित पवारांनी कोल्हेंचा पराभव निश्चित असल्याचा दावा केला आहे. आता जनताच ठरवेल, असंही आढळराव पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT