Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in Loksabha Election 2024 SAAM TV
लोकसभा २०२४

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: २५ वर्षांत केलेलं एक तरी काम दाखवावं, देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

Devendra Fadnavis On Congress: काँग्रेसने 'गरिबी हटावोचा नारा दिला. पण त्यांनी गरिबी नाही हटवली तर गरीब हटवले.', असा टोला फडणवीस यांनी यावेळी राहुल गांधी यांना लगावला.

Priya More

Lok Sabha Election 2024:

उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पियूष गोयल (Piyush Goyal) यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandi) यांच्यावर निशाणा साधला. '२५ वर्षांत केलेलं एक तरी काम उद्धव ठाकरे यांनी दाखवावं.', असे चँलेज फडणवीस यांनी यावेळी केले. त्याचसोबत, काँग्रेसने 'गरिबी हटावोचा नारा दिला. पण त्यांनी गरिबी नाही हटवली तर गरीब हटवले.', असा टोला फडणवीस यांनी यावेळी राहुल गांधी यांना लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसवर टीका करताना सांगितले की, 'उत्तर मुंबईच्या जागेसाठी काँग्रेस आणि उबाठामध्ये पहिले तुम्ही, पहिले तुम्ही असे चालले होते. ही सीट घ्यायला कोणीच नव्हते. ही सीट तुम्ही घेऊन टाका, ही सीट तुम्ही घेऊन टाका असे ते म्हणायचे. शेवटी उबाठाने काँग्रेसच्या माथी मारली. आता काँग्रेस शोधत फिरत आहेत उमेदवार द्या, उमेदवार द्या. जसं घर मिळेल का घर, तसं उमेदवार मिळेल का उमेदवार अशा प्रकारची परिस्थिती काँग्रेसवाल्यांची झाली आहे. याचे कारण त्यांना माहिती आहे. एक मजबुत प्रकारची युती याठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे याठिकाणी आपण सर्व रेकॉर्ड तोडणार यावर मला विश्वास आहे.'

उद्धव ठाकरेंच्या पक्षाची २५ वर्षे मुंबई महानगर पालिकेवर सत्ता होती यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना चँलेंज केले आहे. त्यांनी सांगितले की, 'माझा सवाल आहे की, २५ वर्षे उद्धव ठाकरे यांच्या अधिपत्याखाली मुंबई महानगर पालिका होती. त्यांनी एक काम दाखवावे ज्यामुळे मुंबईचा चेहरा बदलला आणि चित्र बदलले. असे काम ते दाखवू शकतात का?' असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचसोबत, 'गेल्या १० वर्षांत आपले सरकार असताना आणि आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातले सरकार असल्याने मुंबईचा चेहरामोहरा बदलला आहे. यामागचे कारण म्हणजे आमच्या पाठिशी मोदीजींचा आशिर्वाद आहे.'

काँग्रेसवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, 'आपल्याला मुंबई झोपडपट्टी मुक्त करायची आहे. आम्ही काँग्रेससारखे नाही आहोत. त्यांनी गरिबी हटावोचा नारा दिला. पण गरिबी नाही हटवली त्यांनी गरीब हटवले. आम्हाला गरिबी हटवायची आहे. मोदींनी गरिब कल्याणाचा अजेंडा घेतला आहे. गरिबाला घर मिळाले पाहिजे, शौचालय मिळाले पाहिजे. पाणी मिळाले पाहिजे, त्यांच्या आयुष्यात परिवर्तन झाले पाहिजे हे मोदीजींचे स्वप्न आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT