Devendra Fadnavis: खरं इंजिन आमच्यासोबत आलं... आता आमची ताकद वाढली, देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंचे मानले आभार

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: 'खरं इंजिन आमच्यासोबत आलं... आता आमची ताकद वाढली.', असं फडणवीस यावेळी म्हणाले. त्याचसोबत त्यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यासोबत इंडिया आघाडीवर देखील निशाणा साधला.
Devendra Fadnavis And Raj Thackeray
Devendra Fadnavis And Raj Thackeray Saam tv

Devendra Fadnavis On Raj Thackeray:

भाजपचे नेते पियूष गोयल (BJP Leader Piyush Goyal) यांच्या प्रसाचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांची आज उत्तर मुंबईत सभा झाली. या सभेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. 'खरं इंजिन आमच्यासोबत आलं... आता आमची ताकद वाढली.', असं फडणवीस यावेळी म्हणाले. त्याचसोबत त्यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यासोबत इंडिया आघाडीवर देखील निशाणा साधला. 'इंडिया आघाडीमध्ये प्रत्येक जण स्वत:ला इंजिन समजतो.', असा टोला त्यांनी लगावला.

या सभेत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या जनतेला आवाहन केले की, 'तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेच्या उमेदवाराचे बटन दाबले तर ते मत मोदींना मिळेल. अन्य कोणतेही बटन दाबले तर ते मत राहुल गांधींना मिळेल. कारण उद्धवजींचे नेत राहुल गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी. आमचे नेत मोदीजी, शिंदेसाहेबांचे नेते मोदीजी, अजित पवारांचे नेते मोदीजी आहेत. आमची अशी ट्रेन आहे ज्या ट्रेनला मोदींजीचे इंजिन आहेत. या ट्रेनला आम्ही सगळ्या बोग्या लावल्या आहेत. आम्ही सगळे ताकद घेऊन त्या ट्रेनमध्ये बसलो आहोत. आमच्या ट्रेनमध्ये सामान्य लोकांना बसायला जागा आहे.'

Devendra Fadnavis And Raj Thackeray
Maharashtra Unseasonal Rain: अकोला, जळगाव नांदेडसह वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं, घरांसह शेतपिकांचे मोठं नुकसान

विरोधीपक्षाच्या इंडिया आघाडीवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ते म्हणाले की, 'इंडिया आघाडीमध्ये प्रत्येक जण स्वत:ला इंजिन समजतो. एक जण इंजिन बोरीवलीकडे नेतो, दुसरा दक्षिण मुंबईकडे नेतो. एक उत्तर मुंबईकडे नेतो. एक दुसरा पश्चिमेला नेतो. त्यामुळे त्यांची ट्रेन हालतच नाही. इंजिन हे कितीही पावरफुल असले तरी त्यात बसायला ड्रायव्हरला जागा असते. आमचे तसे नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाची ट्रेन घेऊन जाणार आहे.'

Devendra Fadnavis And Raj Thackeray
Uday Samant On Raj Thackeray: राज ठाकरे यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय, उदय सामंत यांचे स्पष्ट मत

तसंच, राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, 'मुंबईकरांनी विचार करायचा की मोदीजींच्या इंजिनमध्ये बसायचे की राहुल गांधीच्या न चालणाऱ्या इंजिनमध्ये बसायचे. खरं इंजिन काल आमच्यासोबत आलं. मुंबईतले चालणाऱ्या इंजिनने सांगितले की मोदीजींच्या इंजिनलाच आम्ही ताकद देणार आहोत. राज ठाकरेंनी मोदींजींना पाठिंबा दिला. राज ठाकरेंनी काल स्पष्टपणे सांगितले या देशाचा विकास मोदीच करू शकतात. त्यांनी कुठलीही शर्त न ठेवता बिनशर्त मोदींना पाठिंबा दिला. त्यांचे आभार मानतो. देशाला काय हवंय याची नाडी राज ठाकरेंना कळाली. त्यामुळे त्यांनी जनतेच्या हिताचा निर्णय घेतला. आता आपली एक मजबूत गाडी झाली आहे.', असे म्हणत फडणवीसांनी राज ठाकरेंचे आभार मानले.

Devendra Fadnavis And Raj Thackeray
Raj Thackeray On BJP: भाजपला माझा सपोर्ट का?, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com