Rahul Gandhi Criticized PM Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Gandhi: द्वेषाच्या राजकारणाला देश कंटाळलाय..., भाजपवर निशाणा साधत राहुल गांधींनी जनतेला केलं मतदान करण्याचं आवाहन

Priya More

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पाचव्या टप्प्यासाठी आज देशामध्ये मतदान होत आहे. मतदानासाठी राजकीय नेते, सेलिब्रिटींसह नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी केली आहे. अशामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत भाजपवर टीका केली आणि नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 'संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी जनता उभी राहिली असून भाजपचा पराभव करत असल्याचे पहिल्या चार टप्प्यातच स्पष्ट झाले आहे.', असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, आज मतदानाचा पाचवा टप्पा! पहिल्या चार टप्प्यामध्येच हे स्पष्ट झाले आहे की जनता संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठीउभी राहिली आहे आणि भाजपचा पराभव करत आहे. द्वेषाच्या राजकारणाला कंटाळलेला हा देश आता आपल्याच मुद्द्यांवर मतदान करत आहे. तरुण नोकऱ्यांसाठी, शेतकरी एमएसपी आणि कर्जमुक्तीसाठी, महिला आर्थिक अवलंबित्व आणि सुरक्षिततेसाठी आणि मजूर रास्त वेतनासाठी.'

राहुल गांधींनी या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, 'जनता स्वत: INDIA सोबत ही निवडणूक लढत आहे आणि संपूर्ण देशात परिवर्तनाचे वादळ वाहू लागले आहे. मी अमेठी आणि रायबरेलीसह संपूर्ण देशाला आवाहन करतो की बाहेर या आणि तुमच्या कुटुंबांच्या समृद्धीसाठी, स्वतःच्या हक्कासाठी, भारताच्या प्रगतीसाठी मोठ्या संख्येने मतदान करा.' राहुल गांधी यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट करत भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी या व्हिडीओद्वारे एका तरुणाने ८ वेळा मतदान केल्याचा दावा केला आहे. त्याचसोबत त्यांनी भाजप सरकारी यंत्रणेवर दबाव आणत देशातील लोकशाही लुटत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून निवडून येण्यासाठी त्यांनी जोरदार प्रचार देखील केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT