Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray Saam tv
लोकसभा २०२४

Chandrashekhar Bawankule: ४ जूननंतर घरात बसून राहण्याचं काम करावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Priya More

Chandrashekhar Bawankule Post:

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आज गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2024) शुभ मुहूर्तावर लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला. चंद्रपूरमधील सभेवरून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. सूर्यग्रहण, अमावस्या आणि नरेंद्र मोदींची सभा, अशा शब्दात त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) त्यांच्यावर प्रत्युत्तर दिले आहे. त्याचसोबत त्यांनी राहुल गांधींवर देखील टीका केली. 'यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकणार.', असे मत त्यांनी व्यक्त केले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'महाभ्रष्टाचारी आघाडीनं ज्यांच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटलं ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जी टीका करत आहेत. हा एक मोठा विनोद आहे.' अशा शब्दामध्ये त्यांनी मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

'मविआचं सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होतं? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सचिन वाझेची नियुक्ती करून महिन्याला १०० कोटींची वसुलीची सुरूवात कोणी केली होती?,'असा सवाल उपस्थित करत त्यांनी याचे उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काँग्रेससोबत राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे.

तसंच, 'खरं तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेमधून शिवसैनिकांनीच तडीपार केलं. ते आता नकली शिवसेना घेऊन सोनियांना शरण गेले आहेत. त्यामुळेच तुकडे गँगचा म्होरक्या असलेल्या काँग्रेसचा जाहीरनामा देखील उद्धव ठाकरेंना प्रिय वाटतोय. पण उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं २०१४, २०१९ प्रमाणे यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकणार आहे आणि ४ जूननंतर तुम्हालाही घरात बसून राहण्याचं आवडतं काम करावं लागेल.' असा टोला लगावत चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पोस्टमध्ये अब की बार ४०० पार! असे देखील नमूद केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT