Rohit Pawar on Raj Thackeray SaamTvNews
लोकसभा २०२४

Rohit Pawar On Raj Thackeray: भाजपसोबत जाऊन आपली स्वायत्तता घालवली, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Loksabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरे यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. 'भाजपसोबत जाऊन राज ठाकरे यांनी आपली स्वायत्तता घालवली.', असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय.

Priya More

सुशील थोरात, अहमदनगर

Rohit Pawar On Ajit Pawar:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये भाषण करताना भाजपाला पाठिंबा असल्याचे जाहिर केले. राज ठाकरेंच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा रंगल्या आहेत. काही राजकीय नेत्यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी त्यांच्या निर्णयावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरे यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. 'भाजपसोबत जाऊन राज ठाकरे यांनी आपली स्वायत्तता घालवली.', असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय. अहमदनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यावरून रोहित पवारांनी निशाणा साधलाय. 'एका स्वायत्त आवाजाने भाजपबरोबर जाऊन त्यांची स्वायत्तता घालवली.' असा टोला त्यांनी लागावलाय. तसंच, 'त्यांना कळते मात्र वळत नसून राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याच्या भूमिकेविरोधात लोकं बोलत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा देखील दिलाय.' असं रोहित पवारांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या संसदेतील भाषणावरून टीका केली होती. यावरून रोहित पवारांनी प्रत्युत्तर देत अजित पवारांवर निशाणा साधलाय. 'भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांवर अजित पवारांनी जहाल पद्धतीने प्रचार केला होता. तर ते भाजपच्या विरोधात बोलत होते म्हणून लोकांना आवडत होते. मात्र आता भाजपची भूमिका घेऊन जवळच्या लोकांवरती टीका करत आहेत. ते भाजपचे नवीन दादा कोणाला पटत नाही.', असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावलाय. तसंच, 'त्यांच्या पक्षाला एकही खासदार मिळणार नसल्याचं', रोहित पवारांनी सांगितलं आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी निवडणुकीत उभे राहावे यासाठी ज्यांनी फोन केले ते पाहून मला धक्का बसल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं. यावरून आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, 'ते जेव्हा बोलतील तेव्हा बघू. आपण लोकांना धक्का बसतो की काय? जी गोष्ट घडलीच नसेल त्याबद्दल बोलून काय करणार.', अस रोहित पवारांनी म्हटलंय. तसंच, 'एकदा तुम्ही नाव जाहीर करा, असे आव्हान देखील त्यांनी केले आहे. तसंच, 'नाहीतर असं असू शकतं देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी फोन केला असावा शिवतारेसाहेब असंच लढत राहवं दादांची बदनामी करत राहावं ते दादांना आवडलं नसेल म्हणून ते म्हणाले मीसुद्धा आश्चर्यचकित झालो असावा.' असा खोचक टोला त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत कारमध्ये सापडली 10,000,00 रुपयांची रोकड; इतकी रक्कम नेमकी कुणाची?

ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा हादरा; विश्वासू नेत्यानं साथ सोडली, तडकाफडकी राजीनामा

Maharashtra Live News Update: पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी घडवली अद्दल

Sunday Horoscope: पैशाची तंगी होणार दूर, ५ राशींची होणार भरभराट, वाचा रविवारचे राशीभविष्य

VIDEO : भरधाव कारनं ४-५ दुचाकींना उडवलं, ट्रॅफिक हवालदार, २ वकिलांसह ५ जखमी, CCTV मध्ये अपघाताचा थरार कैद

SCROLL FOR NEXT