lok sabha nivadnuk nikal 2024 congress karyakarta happy in dhule kolhapur amravati nanded  Saam Digital
लोकसभा २०२४

काँग्रेस कार्यकर्त्यांचा महाराष्ट्रात जल्लाेष, निकालाचा कल समजताच विजयी मिरवणुकीसाठी लागले कामाला

Lok Sabha Election Result 2024 : काेल्हापूर येथे शाहू छत्रपती यांच्या विजयाचे बॅनर विविध ठिकाणी झळकू लागले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरु आहे केला.

Siddharth Latkar

- साम टीव्ही प्रतिनिधी

राज्यातील विविध जिल्ह्यात आज (मंगळवार) सकाळपासून लाेकसभा निवडणुकीच्या मतमाेजणीचे एकेक कल समाेर येऊ लागल्यानंतर विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपआपल्या भागात त्यांचा उमेदवाराच्या नावाने घाेषणा देऊ लागले आहेत. काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तर काही ठिकाणी विजयाची मिरवणुक काढण्याच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. काेल्हापूर, धुळे, अमरावती तसेच नांदेड येथे सकाळी सव्वा नऊ पर्यंत महाविकास आघाडीच्या (काॅंग्रेस) उमेदवारांनी जल्लाेष करण्यास प्रारंभ केला आहे. (lok sabha nivadnuk nikal 2024)

आज सकाळी नऊ वाजेपर्यंत अमरावती येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी आघाडी घेतली हाेती. त्यानंतर अमरावतीच्या काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. काँग्रेस भवन मध्ये काँग्रेसाच्या कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासून उत्साह पाहायला मिळाला. त्यांच्या हा उत्साह अखेरपर्यंत राहिल आणि वाखडेंचा विजय हाेईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिस्पर्धी विराेधात मतांची आघाडी घेतली आहे. शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा पंढरपूर , मोहोळ या मतदारसंघातून प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. या भागातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लाेष सुरु केला आहे. दरम्यान काँग्रेसचा गड असलेल्या सोलापूर शहर मध्य मधून मात्र राम सातपुते आघाडीवर आहेत.

धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या फेरीमध्ये काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव 32 मतांनी आघाडी घेताच कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले. मालेगाव मध्ये सर्वाधिक मतं काँग्रेसला मिळाली आहेत.

नंदुरबार येथे काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांना पाहिल्या फेऱ्यात १९ हजार मतांची आघाडी घेताच कार्यकर्ते दिसत खूष हाेते.

दूसरीकडे चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या 16 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तेथे देखील काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लाेष सुरु केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक,राजस्थानहून आरोपी अटकेत

Mangalsutra Designs: पारंपारिक की मॉडर्न? लग्नासाठी मंगळसूत्राच्या कोणत्या डिझाईन शोभून दिसतील?

Tea and Biscuits Combo: चहासोबत बिस्किटं खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात?

PM Mudra Yojana: सरकारची खास योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज; कोणाला होणार फायदा?

Samrat Choudhary: लाखोंची एफडी, कित्येक तोळा सोनं,भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT