Rahul Gandhi Reaction On Exit Poll  Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Gandhi: सिद्धु मुसेवालाचे २९५ गाणं ऐकलंय का? एक्झिट पोलनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

Rahul Gandhi Reaction On Exit Poll Lok Sabha 2024 Result: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलचे अंदाजांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सिद्धु मुसेवालाच्या २९५ गाण्याचा उल्लेख केला आहे.

Rohini Gudaghe

राज्यात एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडी २९५ पेक्षा अधिक जागांवर दावा करत आहे. कॉंग्रेसने त्यांची आकडेवारी देखील स्पष्ट केली आहे. परंतु एक्झिट पोलमध्ये एनडीएची आघाडी दिसत आहे. यावर राहुल गांधीनी टीका केली आहे. त्यांनी हा एक्झिट पोल विरोधकांचा फँटसी कौल असल्याचं म्हटलं आहे. यावेळी राहुल गांधींनी 'तुम्ही सिद्धू मूसवालाचं २९५ गाणं ऐकलं आहे का? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे निकालाआधी राहुल गांधींना सिद्धु मुसेवालाची आठवण का आलीय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

वास्तविक २९५ हे गाणं प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला (Sidhu Moosewalas) यांनी गायलं होतं. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी २०२२ मध्ये सिद्धू मूसवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मूसवाला हे काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी २०२२ ची विधानसभा निवडणूकही काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. मात्र त्यांचा निवडणुकीत पराभव झाला होता.

राहुल गांधीनी (Rahul Gandhi) सिद्धु मुसेवाला आणि २५ या गाण्याचा उल्लेख केलाय. कारण त्यांना इंडिया आघाडीला २९५ पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचं सांगायचं आहे. काल काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी देखील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी २९५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, अशी घोषणा केली होती. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी बैठक झाली होती. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेण्यात आला. सुमारे अडीच तास ही बैठक चालली होती. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती खर्गेंनी दिली (Lok Sabha 2024 Result) आहे.

संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. काल राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी एनडीएला ३६१ ते ४०१ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली (Lok Sabha Election 2024) आहे. त्यामुळे भारत आघाडीला १३१ ते १६६ जागा मिळण्याची चिन्हं दिसत आहे. याशिवाय इतर एक्झिट पोलमध्ये देखील एनडीएचे सरकार पुन्हा स्थापन होणार असल्याचं चित्र दिसत असल्याची माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT