दिल्ली, ता. १ जून २०२४
देशातील लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरातील ५७ लोकसभा मतदार संघांसाठी हे मतदान होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी मतदार संघाचाही समावेश आहे. आजच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असून सर्वांनी मतदान करण्याच आवाहन केले आहे.
"प्रिय देशवासियांनो, आज मतदानाचा सातवा आणि अंतिम टप्पा आहे आणि आतापर्यंतच्या मतदानावरुन हे स्पष्ट झाले आहे की देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. मला अभिमान आहे की कडक उन्हामध्येही आपण सर्व लोकशाही आणि घटनेचे रक्षण करण्यासाठी मतदान करण्यासाठी बाहेर आला आहात, असे राहुल गांधी यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
तसेच "आजही मोठ्या संख्येने घराबाहेर पडून अहंकार आणि अत्याचारांचे प्रतीक बनलेल्या या सरकारवर 'अंतिम प्रहार करा, जूनचा सूर्य देशात नवीन पहाट आणणार आहे," असे आवाहनही राहुल गांधी यांनी देशवायिसांना केले.
दरम्यान, आज विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची राजधानी नवी दिल्लीत बैठक पार पडणार आहे. ४ जूनला होणाऱ्या मतमोजणी दिवशी काय खबरदारी घ्यावी यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच लोकसभा निवडणुकीचा देखील आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यासह इतर पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.