Lok Sabha Election 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र; गांधी कुटुंबातील या उमेदवाराचं तिकीट कापलं

Lok Sabha Election 2024/BJP Seat Allocation : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज पाचव्या यादीत १११ उमेदवारांची नावं जाहीर केली. मागच्या काही निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या धक्कातंत्राचा वापर यावेळीही करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज पाचव्या यादीत १११ उमेदवारांची नावे जाहीर केली. मागच्या काही निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या धक्कातंत्राचा वापर यावेळीही करण्यात आला आहे. एककडे कंगना रनौतला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून उमेदवारी देण्यात आली असतानाच वरुण गांधी आणि संघमित्रा मौर्य यांचं तिकीट मात्र कापण्यात आलं आहे. मनेका गांधी यांना मात्र उमेदवारांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. तर नवीन जिंदाल आणि डॉ. राजीव भारद्वाज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

भाजपने या यादीत उत्तर प्रदेशमधील 13 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने बरेली, बदाऊन आणि पिलीभीतसह आठ खासदारांची तिकिटे कापलीआहेत. त्यांच्या जागी इतरांना संधी देण्यात आली आहे. भाजपने ज्यांची तिकिटे कापली त्यात संतोष गंगवार, वरुण गांधी, संघमित्रा मौर्य, राजेंद्र अग्रवाल, सत्यदेव पचौरी, अक्षयवर लाल गोंड, उपेंद्र सिंह रावत आणि राजवीर दिलर यांचा समावेश आहे. 

'साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वरुण गांधी यांच्यावर पक्षविरोधी धोरणे राबवल्याचा आरोप आहे. तर संतोष गंगवार यांना त्यांचे वय लक्षात घेऊन तिकीट दिलेले नाही. 13 जागांवर भाजपने सहारनपूरमधून राघव लखनपाल, गाझियाबादमधून अतुल गर्ग, बदायूंमधून दुर्गविजय सिंह शाक्य, मुरादाबादमधून सर्वेश सिंग, मेरठमधून अरुण गोविल, बरेलीमधून छत्रपाल गंगवार, पीलीभीतमधून जितिन प्रसाद, सुलतानपूरमधून मनेका गांधी, सुलतानपूरमधून मेनका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. कानपूरमधून सतीश गौतम, बहराइचमधून अरविंद गोंड, बाराबंकीमधून राजरानी रावत, हाथरसमधून अनूप वाल्मिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने रविवारी बिहारमधील सर्व 17 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यादीत चार नवीन चेहरे आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या जागी पक्षाने माजी आमदार मिथिलेश तिवारी यांना बक्सरमधून उमेदवारी दिली आहे. मुझफ्फरपूरमधून अजय निषाद यांच्या जागी राजभूषण निषाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सासाराममधून छेदी पासवान यांच्या जागी शिवेश राम आणि नवादामधून राज्यसभा खासदार विवेक ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र उमेदवारांमध्ये एकाही महिलेला उमेदवारी देण्यात आलेली नाही. सध्याच्या खासदारांमध्ये रमा देवी या शिवहरमधून पक्षाच्या एकमेव महिला खासदार होत्या. शिवहरची जागा युतीत जेडीयूच्या खात्यात गेल्याने रमा देवी यांचा पत्ता कट झाला आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng Test : इंग्लंडला मोठा धक्का; बेन स्टोक्ससह हुकमी गोलंदाज ओव्हल कसोटीतून बाहेर, प्लेइंग ११ मध्ये ४ बदल

Maharashtra Live News Update: राष्ट्रीय समाज पक्षाची शुक्रवारी पुण्यात बैठक

Maharashtra Politics: राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत आमनेसामने; एकाच सोफ्यावर बसले पण नजरानजर टाळली|VIDEO

Nagpur Crime: धक्कादायक! जुन्या घरगुती वस्तूंची विकणाऱ्याला जबर मारहाण; पाकिस्तानी समजून डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक

Subodh Bhave- Mansi Naik Movie: सुबोध भावे आणि मानसी नाईक दिसणार एकत्र; 'सकाळ तर होऊ द्या' या दिवशी होणार रिलीज

SCROLL FOR NEXT