lok sabha election 2024 amol mitkari criticises rohit pawar Saam Digital
लोकसभा २०२४

रोहित पवारांना पराभव दिसू लागला, तुतारी गटानं रडीचा डाव सुरु केला : अमाेल मिटकरी

विशेष म्हणजे भविष्यात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्यास रोहित पवार नाचायला मोकळा असणार आहे. त्यांचं रडगाण सुरू होणार, आम्ही अगोदर सांगितले होते की पैसे वाटले असेही अमाेल मिटकरींनी नमूद केले.

Siddharth Latkar

- अक्षय गवळी

अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर वारंवार टीका करूनही काहीच हाती लागत नसल्याने आज अखेर मतदानाच्या दिवशी तुतारी गटाकडून रडीचा खेळला जात आहे असा गंभीर आराेप अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर केला. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते मंडळी एक्स वरुन जे ट्विट करीत आहेत ते धांदात खाेटे असल्याचे मिटकरींनी नमूद केले. (Maharashtra News)

आमदार अमोल मिटकरी म्हणाले मतदानाच्या पूर्वसंध्येला रोहित पवारांनी केलेले ट्विट आणि पैसे वाटपाचा आरोप हा खोटा आहे. त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे. त्यातून आता तुतारी गटाकडून आणखी व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बंद आहे. आता ही त्यांची शेवटची फड़फड आहे असेही मिटकरी यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे भविष्यात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्यास रोहित पवार नाचायला मोकळा असणार आहे. त्यांचं रडगाणं सुरू होणार, आम्ही अगोदर सांगितले होते की पैसे वाटले, गुंडागिरी, बँका उघड्या होत्या, ईव्हीएम सेट केल्या, असे आरोप होणार असल्याचे मिटकरी म्हटले. हा फक्त रडीचा डाव खेळला गेलाय आता अपलोड केलेला व्हिडिओ हा फक्त मूर्खपणा असल्याचेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT