Pm Narendra Modi And Aamit Shah
Pm Narendra Modi And Aamit Shah Saam tv
लोकसभा २०२४

Lok Sabha 2024: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, निवडणूक अर्ज दाखल करताच अमित शहा कडाडले

Satish Daud-Patil

Amit Shah on Narendra Modi

नरेंद्र मोदी यांनी देश सुरक्षित केला असून ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी अमित शहा यांनी शुक्रवारी (ता. १९) गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर माध्यमांसोबत बोलताना त्यांनी देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार, असं म्हटलं.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहेत. दुसरीकडे लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. शुक्रवारी अमित शहा (Amit Shah) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित शहा म्हणाले, 'मी गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली असून गांधीनगरचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आहे. मोदीजींनी देश सुरक्षित केला असून २०२४ पर्यंत भारताचा विकास होईल".

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) देशात एनडीएला बहुमत मिळेल. त्याचबरोबर भाजप देशील ३५० जागांचा आकडा पार करेल. नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास केलाय. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, असंही देखील अमित शहा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अमित शहा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक देखील गांधीनगर येथून लढवली होती.

या निवडणुकीत त्यांनी ५ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. गांधीनगर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, यंदा भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसने मोठी रणनिती आखली आहे.

काँग्रेसने गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून पक्ष सचिव सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पटेल यांची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गुजरातमधील सर्व २६ लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Playing XI: आज अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार? LSG विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Buldhana: ज्वारी खरेदीच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप, नोंदणी कार्यालयात तुडुंब गर्दी

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

Benifits of Pomogranate Peel: डाळिंबाची साल कचरा समजून फेकून देताय का? जाणून घ्या आरोग्यादायी फायदे

Bhandara News: पिकविम्यात शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले १०००, १२०० रुपये; बळीराजाचा संताप

SCROLL FOR NEXT