Kolhapur Loksabha Election 2024: Saamtv
लोकसभा २०२४

Kolhapur Loksabha: छत्रपती कुटुंबाने साजेसे काम केले नाही; शाहू महाराजांचे खरे वारसदार समरजित घाटगे.. विरेंद्र मंडलिकांचे विधान!

Kolhapur Loksabha Election 2024: संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती घराण्यावर निशाणा साधला असून छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेस काम केल नाही, असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. २० एप्रिल २०२४

कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर राजकीय वर्तुळात मंडलिकांवर टीकची झोड उठली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती घराण्यावर निशाणा साधला असून छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेस काम केल नाही, असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.

काय म्हणाले विरेंद्र मंडलिक?

"छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेस काम केल नाही. ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी केले, असे विधान खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी केले. कागलमधील भाजप पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

तसेच "राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एकही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकले नाही. 12 / 15 वर्ष बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आलेली नाही. राजर्षी शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार समरजित घाटगे तुम्हीच आहात. शाहू कारखाना तुम्ही चांगला चालवत आहात," असे म्हणत वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती कुटुंबावर टीका केली.

संजय मंडलिकांच्या विधानाने झाला होता वाद!

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी शाहू महाराज हे छत्रपती घराण्याच खरे वारसदार नाहीत, अस विधान केले होते. मंडलिक यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. अशातच आता पुन्हा मंडलिक यांच्या चिरजिवांनी छत्रपती घराण्यावर निशाणा साधल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT