लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यांसाठीचे मतदान संपलं आहे. अवघ्या दोन दिवसांत म्हणजेच येत्या मंगळवारी (४ जून) निकाल जाहीर होणार आहे. यातच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५७.०२ टक्के मतदान झालं. ज्याचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
मुंबई उत्तर पश्चिम हा एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. सुनील दत्त यांच्यानंतर प्रिया दत्त आणि गुरुदास कामत यांना मतदारांनी साथ दिली. पण २०१४ पासून शिवसेनेचे उमेदवार इथून निवडून येत आहेत. येथून सलग दोन वेळा गजानन कीर्तिकर हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्याने दोन गट निर्माण झाले. यात गजानन कीर्तिकर अमोल कीर्तिकर हे शिंदे गटात गेले तर, तर त्यांचे चिरंजीव हे ठाकरे गटातच राहिले.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तीन ठिकाणी भाजपचे तर तीन ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेत.
यातच २०१४ साली पहिल्यांदा शिवसेनेने काँग्रेसकडून ही जागा जिंकली. शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांना ४ लाख ६४ हजार ८२० मतं मिळाली. तर काँग्रेसच्या कामत यांना २ लाख ८१ हजार ७९२ मतं मिळाली. किर्तीकर यांनी विद्यमान खासदार कामत यांचा १ लाख ८३ हजार २८ मताधिक्क्यांनी पराभव केला. तसेच २०१९ ला युतीने पुन्हा किर्तीकरांना संधी दिली. तर काँग्रेसने यावेळी माजी खासदार संजय निरुपम यांना संधी दिली होती. पण किर्तीकर यांना ५ लाख ७० हजार ६३४ मतं मिळाली. तर निरुपम यांना ३ लाख ९ हजार ७३५ मतं मिळाली होती. तब्बल दोन लाख ६० हजार ३२८ मताधिक्क्यांनी किर्तीकरांनी निरुपम यांचा पराभव केला.
दरम्यान, 2024मधील पक्षांची ताकद पाहिली असता. भाजपचे तीन आणि शिवसेनेचे तीन आमदार होते. त्यापैकी अंधेरी पूर्वमध्ये रमेश लटके यांचे अकाली निधन झालं. काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत फुट पडली होती. ठाकरेंकडून पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे गेलं होतं. तेव्हा निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं होतं. तेव्हा रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी मशाल चिन्हावरच निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. काही दिवसांपूर्वी सहा विधानभापैकी तीन भाजपकडे आणि तीन ठाकरे गटाकडे असे आमदार होते. पण रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आणि ठाकरे गटाचं गणित कोलमडलं. असं असलं तरी येथे आता दोन्ही गटामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. यातच मतदारराजा कोणाच्या बाजूने कौल देईल, हे ४ जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.