ठाकरेंची शिवसेना गड राखणार की शिंदेंची शिवसेना बाजी मारणार?

मुंबई महापालिका निवडणुकांची धुष्मचक्री; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार
Maharashtra Political crisis
Maharashtra Political crisis SAAM TV

सुमित सावंत

मुंबई - महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात पार पडतील. पण यंदाची पालिकेची निवडणूक भविष्यात विशेष लक्षात राहण्यासारखी होणार आहे. कारण गेल्या २५ वर्षांपासून ठाकरेंच्या अधिपत्याखाली असलेली पालिका आता ठाकरेंच्या गोटातून बाहेर गेलेल्या आणि स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) निवडणूक युद्ध रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना पालिका निवडणुकांमध्ये दिसेल .

मुंबई (Mumbai) देशाची आर्थिक राजधानी, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका. या मुंबईवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या सोन्याच्या पोपटारुपी पालिकेत शिवसेनेचा जीव अडकलाय असं म्हटलं जातं. म्हणूनचं उर्वरित महाराष्ट्रात नाही, तेवढं लक्ष शिवसेनेचं मुंबई महापालिका आणि या महापालिकेच्या निवडणुकीकडे असतं. म्हणूनच गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिका निवडणुकीत यश मिळवत कायम आपला भगवा फडकवत ठेवण्यात शिवसेना कोणतीच कसर ठेवत नाही.

हे देखील पाहा -

प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेसमोर आव्हान असतं ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जुना मित्र पक्ष असलेल्या भाजपचं. पण यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी किचकट आहे, कारण यंदाची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेनेत रंगण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे , एवढ्यावरच न थांबता आता शिवसेनेतील आजी माजी नगरसेवक देखील आपल्या गटात वळवून घेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत . पण बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे शिवसैनिक स्वतःहून आपल्याकडे येत असल्याचं शिंदेंचं म्हणणं आहे .

मुंबई वगळता इतर महापालिकांमधले नगरसेवक आपल्यात सामील करण्यात शिंदेंना आधीच यश आलंय, आणि आता त्यांचं लक्ष मुंबई महापालिकेवर आहे. शिवसेनेचे उपनेते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आधीच शिंदेंच्या गोटात सामील झाले होते, आणि त्यानंतर आता पहिल्या महिला माजी नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदेंच्या गोटात सामील झाल्यात . दरम्यान आपण आधी भावनेच्या भरात शिंदेंना विरोध केला होता. पण शिंदेंनी घेतलेली भूमिका सर्वसामान्य शिवसैनिकाची आहे म्हणून आपण शिंदेंना समर्थन देण्यासाठी आलो असल्याचं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

Maharashtra Political crisis
Accident News : नागपूर- मुंबई महामार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

यशवंत जाधव, शीतल म्हात्रे यांच्या एकनाथ शिंदेंसोबत जाण्यामुळे आता मुंबईतील नगरसेवक देखील शिंदेंना पाठिंबा देण्यास सुरुवात झाल्याचं चिन्ह आहेत . यामुळे मूळ शिवसेना की शिवसेनेतलेच शिंदे गटात गेलेले नेते शिवसेनेला आव्हान देणार हे नक्कीच आहे . पण त्यामुळे शिवसेनेला पालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवता येईल की पक्षांतर्गत वादामुळे इतर कोणी फायदा घेऊन शिवसेनेच्या पालिकेवरील आजवर असलेल्या निर्विवाद सत्तेला सुरुंग लावेल हे निवडणुकानंतर स्पष्ट होणारच आहे . पण एक चित्र स्पष्ट झालंय, ते म्हणजे सध्यातरी ही महापालिकेची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना रंगणार हे अटळ असल्याचं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com