Shahu Maharaj Chhatrapati Vs Sanjay Mandlik Saam TV
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

Congress Vs BJP: महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या याच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या कोल्हापूरच्या लढतीचा क्लायमॅक्स अजून बाकी आहे. शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढतीला कोल्हापूरकरांनी आपल्या हातात घेतल्याचं चित्र दिसतंय.

साम टिव्ही ब्युरो

Kolhapur Lok Sabha Constituency:

>> प्रवीण देवळेकर

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या याच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या कोल्हापूरच्या लढतीचा क्लायमॅक्स अजून बाकी आहे. शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढतीला कोल्हापूरकरांनी आपल्या हातात घेतल्याचं चित्र दिसतंय. कारण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का यंदा वाढलाय.. मतदानाच्या टक्केवारीत करवीर विधानसभा क्षेत्र सगळ्यात आघाडीवर आहे.

कोणत्या मतदारसंघात किती मतदान?

करवीर विधानसभा क्षेत्रात 79 टक्के मतदान झालंय. तर कागलमध्ये 73 टक्के, चंदगडमध्ये 68 टक्के, राधानगरी भुदरगडमध्ये 66 टक्के, कोल्हापूर दक्षिणमध्ये 69.80 टक्के आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा क्षेत्रात 64 टक्के मतदान झालंय.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक घराण्याचा मोठा प्रभाव राहिलाय. संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक तब्बल 4 टर्म कोल्हापूरचे खासदार राहिलेत. यानंतर 2019 मध्ये संजय मंडलिक यांनी शिवसेनेच्या तिकिटावर कोल्हापूरची जागा जिंकली. मात्र संजय मंडलिक शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर परिस्थिती बदलली.

संजय मडलिकांविरोधात ठाकरे गटासह मविआकडे सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळे मविआने संभाजीराजेंना मविआतील कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची ऑफर दिली. संभाजीराजेंनी मविआची ऑफर नाकारल्यानंतर उमेदवारीचा चेंडू शाहू महाराजांच्या कोर्टात गेला. आता शाहू महाराजांना मविआतील कोणताही पक्ष निवडण्याची मूभा होती. शाहू महाराजांनी काँग्रेसकडून लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे-पवारांनी त्यांना सन्मानपूर्वक पाठिंबा दिला.

छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे कोल्हापूरच्या राजकारणाचा कल बदलला. कोल्हापुरात करवीर संस्थान आणि शाहू महाराजांसाठी असलेल्या आस्थेमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं. म्हणूनच संजय मंडलिकांनी आक्रमक भूमिका घेत कोल्हापूरच्या गादीवरच हल्ला चढवला होता.

एकनाथ शिंदें यांनीही लोकसभेच्या प्रचारात मान गादीला आणि मत मोदीला म्हणत संजय मंडलिकांना मत देण्याचं आवाहन केलं. मात्र मतदानाची वाढलेली टक्केवारी लक्षात घेता बदल घडवण्यासाठी प्रतिसाद मिळाला असल्याचे संकेत आहेत..त्यामुळे कोल्हापुरात मान आणि मत नेमकं कुणाला मिळालं हे 4 जूनला स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Leopard Attack: चिमुरड्यांनी बिबट्याला पळवलं, दप्तरानं वाचवला विद्यार्थ्याचा जीव

Heavy Rain Alert : राज्यातून गुलाबी थंडी गायब? ऐन हिवाळ्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

SCROLL FOR NEXT