Kanhaiya Kumar Vs Manoj Tiwari: Saamtv
लोकसभा २०२४

Loksabha Election: मनोज तिवारींविरोधात कन्हैया कुमार मैदानात! दिल्लीत काँग्रेसची मोठी खेळी; काय आहे रणनिती?

Kanhaiya Kumar Vs Manoj Tiwari: कन्हैया कुमार यांना काँग्रेसने ईशान्य दिल्लीतून रिंगणात उतरवले आहे. तो भाजपचे मनोज तिवारी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

Gangappa Pujari

दिल्ली, ता. १५ एप्रिल २०२४:

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी एक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्या यादीत सर्वात मोठे नाव म्हणजे कन्हैया कुमार. कन्हैया कुमार यांना काँग्रेसने ईशान्य दिल्लीतून रिंगणात उतरवले आहे. ते भाजपचे मनोज तिवारी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसच्या या खेळीने बिहारी विरुद्ध बिहारी असा सामना पाहायला मिळणार आहे.

कन्हैया कुमार विरुद्ध मनोज तिवारी!

गेल्या अनेक वर्षांपासून बिहारच्या राजकारणात अधिक सक्रिय दिसणारे कन्हैया कुमार आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत परतले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून कन्हैया कुमार यांना दिल्लीतील एखाद्या जागेवरून उमेदवारी देऊ शकते, अशी शक्यता होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले असून कन्हैया कुमार दिल्ली ईशान्यमधून भाजपच्या मनोज तिवारींविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत.

काय आहे काँग्रेसची रणनिती?

कन्हैया कुमार यांना (Kanhaiya Kumar) दिल्ली ईशान्यमधून उतरवण्यामागे काँग्रेसची मोठी रणनिती आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ उत्तरप्रदेशला लागून आहे. त्याठिकाणी बिहार आणि हरियाणातील लोक मोठ्या संख्येने येथे राहतात. तसेच जागेवर पूर्वांचली मतदारांची संख्याही निर्णायक आहे. त्यामुळे बिहारी विरुद्ध बिहारी अशी लढत करण्याचा डाव काँग्रेसने आखला आहे.

दरम्यान, पुर्वांचल तसेच बिहारी मतदारांमुळे या जागेवरुन 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत मनोज तिवारी (Manoj Tiwari) हे मोठ्या फरकाने विजयी झाले होते. त्यामुळे काँग्रेस, आप तसेच बिहारी मतदारांचा विचार केल्यास कन्हैया कुमार मनोज तिवारी यांच्यासमोर आव्हान उभे करु शकतात. हाच विचार करुन काँग्रेसने कन्हैया कुमार यांना ही उमेदवारी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT