Sangli lok sabha : सांगलीत मोठा ट्विस्ट; महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार, विशाल पाटील अपक्ष लढणार?

Sangli lok sabha Election News Update : काँग्रेस नेते विशाल पाटील यांची नाराजी कायम आहे. ते अपक्ष अर्ज दाखल करण्याचीही शक्यता आहे. याचदरम्यान, सांगलीतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Sangli lok sabha
Sangli lok sabha Saam tv

Sangli lok sabha Latest News :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडमोडी पहायला मिळत आहे. सांगलीतही महाविकास आघाडीत मोठी ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सांगलीत ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तरी दुसरीकडे काँग्रेस नेते विशाल पाटील यांची नाराजी कायम आहे. ते अपक्ष अर्ज दाखल करण्याचीही शक्यता आहे. याचदरम्यान, सांगलीतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सांगलीतील आज सोमवारी पार पाडणाऱ्या महाविकास आघाडी मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन केलं आहे. सांगलीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात चंद्रावर पाटील यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Sangli lok sabha
Loksabha Election: अर्ज भरायला ४ दिवस बाकी, उमेदवार मात्र ठरेना! साताऱ्यात उदयनराजे; रत्नागिरीत नारायण राणे वेटिंगवर?

राष्ट्रवादी शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून विश्वजीत कदम यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, त्यांनी मेळाव्याला न जाण्याची भूमिका काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी जाहीर केली आहे. विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा आणि कार्यकर्त्यांची नाराजी असल्याने मेळाव्याला जाणार नाही, अशी भूमिका आमदार विक्रम सावंत यांनी स्पष्ट केली आहे.

ठाकरे गटाकडून काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील,माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्यासह जिल्हा काँग्रेसला मेळाव्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान, या मेळाव्याला काँग्रेस आमदार विश्वजीत कदम मेळाव्याला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Sangli lok sabha
Abhishek Ghosalkar Death: सलमान खानसाठी तत्परता; अभिषेकच्या हत्येकडे दुर्लक्ष का? तेजस्वी घोसाळकरांची उद्विग्न पोस्ट

काँग्रेस नेते बैठकीसाठी नागपूरकडे रवाना

काँग्रेस नेते तातडीच्या बैठकीसाठी नागपूरकडे रवाना झाले आहेत. आमदार विश्वजीत कदम आणि आमदार विक्रम सावंतसह ,पृथ्वीराज पाटील यांना तातडीने नागपूरकडे येण्याचे निरोप देण्यात आला आहे.

आज सोमवारी सांयकाळी 9 वाजता नागपूरमध्ये बैठकीसाठी बोलवण्यात आले. काँग्रेस नेते चेंनिथल, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. मंगळवारी विशाल पाटील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने,तातडीची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com