Shrikant Shinde Won Against Vaishali Darekar From the Kalyan Lok Sabha Constituency  Saam TV
लोकसभा २०२४

Kalyan Election 2024 Winner: सलग तिसऱ्यांदा श्रीकांत शिंदे खासदारकीचे मानकरी; कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजय

Shrikant Shinde Won From Kalyan Lok Sabha Constituency: खासदार श्रीकांत शिंदेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा गड राखला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर होत्या. त्यांचा पराभव झाला आहे.

Ruchika Jadhav

अभिजित देशमुख

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांचा विजय झालाय. सलग तिसऱ्यांदा खासदार श्रीकांत शिंदेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा गड राखला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर होत्या. त्यांचा पराभव झाला आहे. काही वेळातच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणारे.

सध्या आलेल्या कलांनुसार, वैशाली दरेकर यांना ३,२४,५८८ मतं मिळालीत. तर डॉ. श्रीकांत शिंदे यांना ५,७२,४७८ मतं मिळालीयेत. त्यानुसार २,४७,८९० मतांनी वैशाली दरेकरांचा पराभव होताना दिसत आहे.

विजय मिळवल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी साम टीव्हीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्या मतदारांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांनी सलग तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास ठेवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास दाखवला आणि संधी दिली त्यामुळे त्यांचेही धन्यवाद.

राष्ट्रवादी अजित पवार गट आमच्यासोबत होता. त्यांच्यासह महायुतीच्या सर्वच पक्षांनी या विजयासाठी मेहनत केली आणि मोठी साथ दिली. त्यामुळेच माझा विजय होऊ शकला आणि पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयी झालो, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT