Shrikant Shinde: ही निवडणूक व्यक्तीची नाही, तर देशाची; श्रीकांत शिंदेंनी नागरिकांना केलं मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन

Lok Sabha Election 2024: श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले की, निवडणुकीचे वातावरण आहे. 20 मे रोजी आपल्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Shrikant Shinde
Shrikant Shinde NewsSaam Tv
Published On

>> अभिजित देशमुख, कल्याण

Shrikant Shinde News:

कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला वासुदेव बळवंत फडके मैदानात जल्लोष सप्तसुरांनी सूरमयी कार्यक्रम संपन्न झाला. ज्यामध्ये नचिकेत लेलेच्या गाण्याने, आशिष पाटीलच्या मनमोहक नृत्याने, डॉ. संकेत भोसलेच्या रंजक मिमिक्रीने आणि आदिती सारंगधर या चौघांच्या दिलखेचक अदाकारीने या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण संस्कृती मंचच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हिंदू नववर्ष स्वागत यात्रे निमित्ताने नयनरम्य अशा फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shrikant Shinde
TMC MP Protest: टीएमसीचे खासदार निवडणूक आयोगाबाहेर करत होते निदर्शने, पोलिसांनी घेतलं ताब्यात

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले की, निवडणुकीचे वातावरण आहे. 20 मे रोजी आपल्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अजून चाळीस दिवस बाकी अहेत. ही निवडणूक व्यक्तीची नाही तर देशाची आहे.  (Latest Marathi News)

ते म्हणाले, देशाच्या निवडणुकीत सहभागी होणे गरजेचे आहे. त्यामुळे 20 मे रोजी जर कोणी गावी जात असेल तर, गावाला जाऊन 20 मेच्या अगोदर आलं पाहिजे आणि 20 मे रोजी मतदान केलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

Shrikant Shinde
Rahul Gandhi : हेलिकॉप्टरचं संपलं इंधन, प्रचाराचं गणित बिघडलं; मध्य प्रदेशात अडकले राहुल गांधी

या कार्यक्रमाला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसी आयुक्त डॉ इंदू राणी जाखड, कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, नववर्ष स्वागतयात्रा समन्वयक डॉ. प्रशांत पाटील, आयएमए कल्याण अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर अनेक मान्यवर कल्याणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com