kalyan dombivali uddhav balasaheb thackeray shiv sena chief vivek khamkar to join eknath shinde faction Saam Digital
लोकसभा २०२४

वैशाली दरेकरांच्या रॅलीत विवेक खामकरांची दांडी, ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र', शिंदे गटाच्या वाटेवर?

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले विवेक खामकर हे आता काेणता निर्णय घेणार याची चर्चा रंगली आहे.

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

Kalyan Dombivali News :

लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाला कल्याण डोंबिवलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट धक्का देण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांची नाराजी संधी साधत त्यांचा शिवसेना प्रवेश घेण्याची तयारी शिंदे गटाने सुुरु केली आहे. येत्या 2 दिवसांत खामकर हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांकडून वर्तवली जात आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

ठाकरे गटाचे डोंबिवलीचे शहर प्रमुख विवेक खामकर गेलं काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरू होती. आज ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, वरून सरदेसाई महाविकास आघाडीतील मातब्बर नेते डोंबिवलीत हाेते. परंतु दरेकर यांच्या प्रचार रॅलीत डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर मात्र दिसले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा रॅलीत देखील रंगली.

विवेक खामकर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खामकर यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन देत ठाकरे गटात राहणे पसंत केले होते. विवेक खामकर यांच्यावर डोंबिवली शहर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाकडून अनेक आंदोलन देखील केली.

ठाकरे गटाकडून लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांचे नाव जाहीर झाले. वैशाली दरेकर यांच्याकडून समन्वय साधला गेला नाही, विश्वासात घेतले गेले नाही या कारणामुळे विवेक खामकर हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आज दरेकर यांच्या रॅलीत ते सहभागी न झाल्याने खामकर यांच्या मनात नेमकं काय चालले आहे याची चर्चा रंगली असतानाच खामकरांचा शिंदे गटात प्रवेश हाेणार असल्याचे सांगितलं गेले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आदित्य ठाकरे डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंचा कोल्हापुरातून 'करेक्ट कार्यक्रम'

आदित्य ठाकरे डोंबिवलीत असताना श्रीकांत शिंदे यांचा कोल्हापुरातून 'करेक्ट कार्यक्रम केला. ठाकरे गटाचे शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह महिला जिल्हा संघटक, युवती सेना पदाधिकारी यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. या प्रवेशांमुळे 'कल्याणच्या डॉक्टरांनी वरळीच्या आमदाराचे ऑपरेशन' केल्याची चर्चा रंगली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

SCROLL FOR NEXT