Mehbooba Mufti and rahul gandhi Saam Tv
लोकसभा २०२४

INDIA Alliance: काश्मीरमध्येही इंडिया आघाडीत फूट? मेहबूबा मुफ्ती तिन्ही जागांवर उमेदवार उभे करणार

Mehbooba Mufti: काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला धक्का बसताना दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याआधी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती आणि सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले होते.

साम टिव्ही ब्युरो

Jammu and Kashmir:

काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला धक्का बसताना दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याआधी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती आणि सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले होते. आता जम्मू-काश्मीरमध्येही तशीच परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.

पीडीपी अध्यक्ष आणि जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे की, नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरच्या तीनही लोकसभा जागांवर उमेदवार उभे करणार आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्या या वक्तव्यानंतर येथेही इंडिया आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकतेच नॅशनल कॉन्फरन्सने सांगितलं आहे की, ते सर्व तीन जागांवर उमेदवार उभे करणार आहे. नॅशनल कॉन्फरन्सने इंडिया आघाडीचा भाग म्हणून जम्मूच्या दोन जागा काँग्रेससाठी सोडल्या आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की, ''त्यांनी (नॅशनल कॉन्फरन्स) आमच्यासाठी उमेदवार उभा करून निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय सोडलेला नाही. पक्षाचे संसदीय मंडळ उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेईल, असे त्या म्हणाल्या.  (Latest Marathi News)

दरम्यान, याआधी पाटणा ते दिल्लीतील रामलीला मैदानापर्यंत झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेला मेहबूबा सहभागी झाल्या आहेत. त्या इंडिया आघाडीच्या प्रत्येक बैठकीत आणि सभेत याआधी दिसल्या आहेत. असं असलं तरी इंडिया आघाडीच्या गटपक्षांसोबत त्यांचं जागावाटपावर ताळमेळ होताना दिसत नाही.

उधमपूर लोकसभा मतदारसंघाची काय आहे परिस्थिती?

जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या एकूण पाच जागा आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे तिसऱ्यांदा उधमपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने चौधरी लाल सिंग यांना उमेदवारी दिली आहे. डेमोक्रॅटिक आझाद पक्षाकडून (डीपीएपी) माजी मंत्री जीएम सरूरी यांना मैदानात उतरवल्याने ही लढत तिरंगी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT