Vaishali Darekar News: उद्धव ठाकरेंची मोठी चाल! श्रीकांत शिंदेंविरोधात रणरागिणी मैदानात; कोण आहेत वैशाली दरेकर?

Shivsena Thackeray Group Candidate List: उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी करत वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मशाल चिन्हावर त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिदे यांना टक्कर देणार आहेत.
Who Is Vaishali Darekar Rane:
Who Is Vaishali Darekar Rane: Saamtv

Who Is Vaishali Darekar Rane:

लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे कल्याणमधून अद्याप शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होत नसतानाच उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी करत वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मशाल चिन्हावर त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिदे यांना टक्कर देणार आहेत. कोण आहेत वैशाली दरेकर जाणून घ्या.

उद्धव ठाकरेंचे धक्कातंत्र...

कल्याण लोकसभेसाठी (Kalyan Loksabha) ठाकरे गट कोणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्याही नावाची चर्चा झाली. मात्र उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सर्वांना धक्का देत सामान्य शिवसैनिका असलेल्या वैशाली दरेकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

कोण आहेत वैशाली दरेकर राणे?

वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांनी शिवसेना नगरसेविका म्हणून काम केले आहे. सध्या त्या ठाकरे गटाच्या उपशाखा संघटक आहेत. २००९ पुर्वी त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होत्या. त्यांनी मनसेकडून २००९ मध्ये लोकसभा निवडणुकही लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी एका लाखांपेक्षा अधिक मते मिळवली होती. त्यानंतर मनसे सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही त्या ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्या.

Who Is Vaishali Darekar Rane:
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे धक्कातंत्र! श्रीकांत शिंदेंविरोधात वैशाली दरेकर मैदानात; लोकसभेची दुसरी यादी जाहीर

ठाकरे गटाकडून लोकसभेचे उमेदवार जाहीर..

दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये  कल्याणमधून वैशाली दरेकर , जळगावमधून करण पवार, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांच्या नावाचा समावेश आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Who Is Vaishali Darekar Rane:
Sanjay Shirsat : ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात; संजय शिरसाठ यांचा मोठा दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com