गिरीश कांबळे, मुंबई|ता. ३ एप्रिल २०२४
जळगावमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश झाला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी कल्याणमधून (Kalyan Constituency) वैशाली दरेकर , जळगावमधून (Jalgaon Constituency) करण पवार, हातकणंगलेमधून (Hatkanangale Constituency) सत्यजित पाटील आणि पालघरमधून (Palghar Constituency) भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंकडून पत्रकार परिषदेमध्ये ४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कल्याणमधून श्रिकांत शिंदे यांच्याविरोधात वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तसेच हातकणंगलेमधून सत्यजित आबा पाटील, जळगावमधून करण पवार आणि पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आज भाजपमधून (BJP) ठाकरे गटात आलेले उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यांच्याऐवजी करण पवार यांना जळगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हातकणंगले मतदार संघामध्ये राजू शेट्टी यांच्याविरोधात ठाकरे गटाने सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजू शेट्टी यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. त्यांना सांगितलं होतं की रीतसर मविआमध्ये सामील व्हा, किंवा मशाल चिन्हावर लढा, आम्ही तिन्ही पक्ष पाठिंबा देतो. पण त्यांनी नाही म्हटलं, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.