Kalyan Kale vs Raosaheb Danve Saam TV
लोकसभा २०२४

Jalna Lok Sabha 2024 Result : रावसाहेब दानवेंना मतदारांचा 'चकवा', जालन्यातून काँग्रेसचे कल्याण काळे विजयी

Kalyan Kale vs Raosaheb Danve : जालना लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांनी दानवे यांना पराभवाची धूळ चारली.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला. जालना लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांनी दानवे यांना पराभवाची धूळ चारली. कल्याण काळे जवळपास ९० हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. हा भाजपला बसलेला मोठा झटका आहे.

कारण, जालना लोकसभा मतदारसंघ जवळपास ३० वर्षांपासून भाजपचा गड होता. याच गडाला सुरूंग लावण्याचं काम कल्याण काळे यांनी केलं. त्यांचा विजय होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. दुसरीकडे दानवे यांचे कार्यकर्ते अत्यंत निराश झाले. विशेष बाब म्हणजे या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी दीड लाखांहून अधिक मताधिक्य घेतलं.

त्यांनी पान्हा या चिन्हावर निवडणूक लढवली. मंगेश साबळे यांच्यामुळेच रावसाहेब दानवे यांना पराभवाचा सामना करावा लागला, अशी चर्चा मतदारसंघात आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत होता. मराठा आरक्षणाच्या ताटकळलेल्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील अनेक मतदार भाजपवर नाराज होते.

१३ मे रोजी मतदान पार पडल्यानंतर या मतदारसंघातून कल्याण काळे यांचाच विजय होईल, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, एक्झिट पोलच्या आकड्यांनी अर्थातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात तराजूत झुकते माप टाकले. पण मराठा मतदार दानवेंना 'चकवा' अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

आज मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कल्याण काळे आघाडी घेतली. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी जोरदार मुसंडी मारून कल्याण काळेंनी घेतलेली लीड कमी केली. पण, त्यानंतर कल्याण काळे यांनी पुन्हा आघाडी घेत दानवेंना पिछाडीवर सोडलं. अखेर अटीतटीच्या लढतीत कल्याण काळेंनी बाजी मारली.

रावसाहेब दानवे या मतदारसंघातून सलग पाचवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी केंद्रीय मंत्रीपद देखील भूषवलं. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. राजकीय डावपेच आखून विरोधकांना चकवा देणाऱ्या दानवेंना यंदा मतदारांनीच 'चकवा' दिल्याने भाजपला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT